22 September 2017

News Flash

मीरा, तू कायम आम्हाला कमी लेखायची; शाहिदच्या पत्नीवर गंभीर आरोप

मीराचा कॉलेजमधील स्वभाव सांगण्यासाठी तिच्या क्लासमेटने लिहिले खुले पत्र

ऑनलाइन टीम | Updated: March 20, 2017 7:54 PM

मीरा राजपूत

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी चंदेरी दुनियेपासून दूर असली तरी पतीमुळे ती अनेकदा प्रसारमाध्यमांना सामोरी जाताना दिसते. शाहिद कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारी मीरा सध्या जागतिक महिला दिनादिवशी दिलेल्या मुलाखतीमुळे चांगलीच चर्चेत आली. महिला दिनी मीराने काम करणाऱ्या महिलांविरोधी वक्तव्य केल्यामुळे तिच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये आता आणखी भर पडली आहे. तिच्या क्लासमेटने तिच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली असून, एका खुल्या पत्राच्या माध्यमातून तिने मीरावर आरोप केला आहे.

सोशल मीडियाचा आधार घेत मीराच्या क्लासमेटने लिहिले आहे की, मीरा तुझी मुलाखत पाहिल्यानंतर मला खूप राग आला. मी कॉलेजमध्ये तुझ्या बॅचमध्ये होते. आज मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगते की, स्त्रीवादाविषयी (फेमिनिझम) तुझा दृष्टिकोन फारच वाईट आहे. तुझ्यापेक्षा खालच्या आर्थिक स्तरावरील वर्गमैत्रिणींना तू कशी वागणूक देत होतीस, हे मला चांगले माहिती आहे. त्यांना तू नेहमीच खालच्या पातळीवर लेखायची. हा प्रकार तुझ्यातील खालची पातळी दाखवून देणारा होता. त्यानंतर काम करणाऱ्या महिलांविरोधातील तुझ्या भूमिकेमुळे मला कॉलेजची आठवण आली. वास्तविक सशक्तीकरणासंदर्भात तू अज्ञानी आहेस, असेही तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

जागतिक महिला दिनादिवशी केलेल्या विधानावर मीरावर अनेकांनी निशाणा साधला होता. यावेळी शाहिद कपूरने पत्नीची पाठराखण केली होती. मीराने तिचा वैयक्तिक अनुभव शेअर केला असून, लोकांनी तिच्यावर टीका करणे अयोग्य असल्याचे शाहिदने म्हटले होते.

First Published on March 20, 2017 7:54 pm

Web Title: mira rajput batchmate criticises her in an open letter
 1. K
  kala sahastrbuddhe
  Mar 20, 2017 at 4:09 pm
  शाहिद नवरा मिळाल्यावर जळणारे काय कमी असतील काय ?
  Reply
  1. S
   Shailesh Toshniwal
   Mar 21, 2017 at 7:10 am
   जर ती बेचमेट होती तर मीरा शी खाजगी रीत्या बोलायला हव . सर्वा समोर पत्र लीहीणे म्हणजे द्वेश दीसुन येतो .
   Reply