राकेश ओमप्रकाश मेहरांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिर्झिया’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाद्वारे दोन नवीन चेहरे बॉलिवूडला मिळणार आहेत. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि साईयामी खेर ‘मिर्झिया’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर शानदार असून, ट्रेलरमध्ये भन्नाट लोकोशन्स अनुभवायला मिळतात. गुलजार यांची कथा असलेल्या या चित्रपटात ओम पुरी, आर्ट मलिक आणि के के रैना देखील मुख्य भूमिकेत दिसतील. ७ ओक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला काही तासांत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले.