भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सध्या त्याची मुलगी झिवा सोबत धमाल-मस्ती करत आहे. या धमाल-मस्तीचे फोटो तो सोशल मीडियावरदेखील शेअर करत असून, त्याच्या या फोटोंनी समाज माध्यमांवर धमाल उडवून दिली आहे. माहीची मुलगी झिवा दीड वर्षांची झाली आहे. तिच्या जन्मावेळी धोनी क्रिकेटमध्ये व्यग्र असल्याने कुटुंबाला वेळ देऊ शकला नव्हता. परंतु आता त्याला व्यग्र जीवनशैलीतून फावला वेळ मिळाला असून, सध्या तो लाडक्या झिवासोबत धमाल-मस्ती करत आहे. धोनीने झिवासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही गंमत करताना दिसतात. वडिलांबरोबर गंमती-जंमती करणारी छोटीशी झिवादेखील आनंदित असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. धोनीने हा व्हिडिओ फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया साइट्सवर अपलोड केला आहे. फेसबुकवर आत्तापर्यंत लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, धोनीच्या चाहत्यांनी या व्हिडिओचे खूप कौतुक केले आहे. धोनीप्रमाणे त्याची पत्नी साक्षीदेखील व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करत असते. ऑक्टोबरपर्यंत कोणताही सामना खेळणार नसणारा धोनी सध्या कुटुंबासमवेत सुट्टीचा आनंद उपभोगत आहे.


मुलगी झिवासोबतचे धोनीचे आनंदाचे क्षण –

@Regrann from @sakshisingh_r – #monkeyface … #Regrann – Omggggggg <3 Their monkey faces!😍

A video posted by MS Dhoni's Army (@dhonisarmy) on