20 September 2017

News Flash

स्टार किड असल्यामुळेच माझे नुकसान झाले- अथिया शेट्टी

बाबांमुळेच मला अधिक ओळख आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 7:34 PM

एका मोठ्या कलाकाराचा मुलगा असणं किंवा मुलगी असणं म्हणजे सहज काम मिळतं, असाच अनेकांचा समज असतो. पण प्रत्यक्षात तसे काही असते का हे मात्र फारसे कोणाला माहित नसते. अभिनेता सुनील शेट्टची मुलगी अथिया शेट्टीने मात्र स्टार किड असल्याच्या फायद्यांपेक्षा नुकसानच जास्त असते हे सांगितले. घराणेशाहीचा सामना करावं लागणं हेच मोठ्या समस्या असल्याचं तिने सांगितले.

…म्हणून करणने वरुण धवनला ‘बाहुबली ३’ साठी नकार दिला

‘मुबारका’ स्टार अथिया पुढे म्हणाली की, एक स्टार कीडला जसे फायदे असतात तसेच तोटेही असतात. आम्हाला सिनेसृष्टी आणि प्रसारमाध्यमांकडून सतत प्रेम मिळतं, याचं मुख्य कारण माझे बाबा आहेत. पण घराणेशाहीचे आरोपही आम्हाला सहन करावे लागतात. २०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’ सिनेमातून अथियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Chandigarh Kidaaaaan! 🙏🏻❤️🎉💃 (Tap for details)

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

स्टार किड असल्यामुळे तुम्हाला पहिला सिनेमा तर सहज मिळून जातो. पण आम्ही अशा इण्डस्ट्रीमध्ये आहोत जिथे उत्कृष्ट काम असेल तरच तुम्ही टीकू शकता. जर तुमच्यात टॅलेण्ट नसेल आणि तुमच्या मागे प्रेक्षक नसतील तर बॉलिवूडमध्ये टिकून राहणं निव्वळ अशक्य आहे.
आपल्या आगामी सिनेमाबद्दल बोलताना अथिया म्हणाली की, माझ्या २१ व्या वाढदिवसा दिवशी मी हा सिनेमा स्वीकारला. त्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी फार खास आहे. या सिनेमात अथियासोबत अर्जुन कपूरही दिसणार आहे. या सिनेमात तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. या सिनेमातून अनिल आणि अर्जुन ही काका- पुतण्यांची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. अनिझ बाझमी यांचा ‘मुबारका’ या सिनेमाची कथा अशा क्रेझी कुटुंबाभोवती फिरत असते.

IIFA 2017: ‘टन टना टन’वर ‘जुडवा’ स्टार थिरकले

या कुटुंबामध्ये करण आणि चरण अशी जुळी मुलं असतात. या जुळ्या मुलांची व्यक्तिरेखा अर्जुनने साकारली असून त्याच्या काकांची म्हणजेच करतार सिंग ही व्यक्तिरेखा अनिल कपूरने साकारली आहे. या दोघांमुळे कुटुंबात किती गोंधळ उडतो ते दाखवण्यात आले आहे. अनिझ यांच्या नावावर ‘नो एण्ट्री’, ‘सिंग इज किंग’, आणि ‘रेडी’ अशा अनेक यशस्वी विनोदीपटांची यादी आहे. २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

First Published on July 17, 2017 7:34 pm

Web Title: mubarakan actor athiya shetty reveals biggest disadvantage of being star child see photos
 1. S
  Shilpa
  Jul 18, 2017 at 10:52 am
  अभिनय शिक अगोदर .. मग मोठ्या मोठ्या गप्पा मर... आलिया भट सुद्धा स्टार कीड आहे तरी ती यशस्वी आहे ना...
  Reply
  1. B
   Balaji Patil
   Jul 17, 2017 at 8:21 pm
   टुकार स्टार कीड नेहमी अयशवी होतात तर चांगले स्टार किड्स उदा. काजोल सारखे यश्वी होतात. दुसरा धंदा पाणी बघा आता
   Reply