लग्नाला तर जायचंच पण लग्न नक्की होणार कुठे मुंबईत की पुणे असा नवा वाद निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे हा वाद आहे तो स्वप्नील जोशी आणि मुक्ती बर्वे यांच्यातला. अहो, घाबरू नका हा वाद काही ख-या जीवनातला नाही. तर, हा वाद त्यांच्या आगामी मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटातला.
सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई या २०१० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला. याविषयी सतीश म्हणाला की, ‘पहिला मुंबई पुणे मुंबई केवळ दोन पात्रांभोवती चित्रित करण्यात आला होता. एक मुलगा प्रवासात एका मुलीला भेटतो आणि ते दोघे एकमेकांबद्दल बोलत, दोन शहर कशी भिन्न आहेत याबद्दल गप्पा मारत एक अख्खा दिवस एकत्र घालवतात. चित्रपटभर ते दोघे कल्पना, मते, अवकाश आणि इतर मुद्दे कसे वेगळे आहेत याबद्दल चर्चा करतात. दोन परस्पर विरूद्ध व्यक्ती एकत्र भेटतात आणि शेवटी प्रेमात पडतात. मुंबई-पुणे-मुंबई हळूवार सुरू होतो आणि शेवटी ती एक वेगळी लव्ह स्टोरी होते. संपूर्ण जगातील लोकांना हळूहळू या सिनेमाबद्दल कळले आणि ते या प्रवासाच्या प्रेमात पडू लागले. या सिनेमातील दोन व्यक्तिरेखांच्या आपण कुठे जवळपास तरी आहोत का याचा शोध घेऊ लागले. हा सिनेमा वेगवेगळ्या सहा भाषांमध्ये बनवला गेला आणि ग्लोबल ठरला. स्वप्नील आणि मुक्ताला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि प्रेक्षकांना त्या दोघांना पुन्हा पहायचे होते. प्रेमातली पुढची पायरी म्हणजे लग्न. त्यामुळे पुन्हा १२ नोव्हेंबर २०१५ रोजी या आणि प्रेमाच्या प्रवासाचा शोध घ्या… कारण प्रेमकथा सदाबहार असतात.

मुंबई पुणे मुंबई -२ सह कुटुंब सह परिवार… लग्नाला यायचंच!’
या दिवाळीत १२ नोव्हेंबर २०१५ ला तुमच्या कॅलेंडरमध्ये ‘मुंबई पुणे मुंबई -२, लग्नाला यायचंच’ साठी खूण करून ठेवा.