‘नच बलिए ७’ ची विजेती ठरलेली जोडी अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा हे सॉ़लिटेअर होंडा कारचे मानकरी ठरले आहेत.
IMG_7572-1
नंदीश संधू-रश्मी देसाई, उपेन पटेल-करिश्मा तन्ना आणि मयुरेश वाडकर-अजीशा शाह या जोड्यांचा अमृता-हिमांशुने पराभव करत नच बलिएच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. ट्रॉफीसह त्यांना ३० लाखांचा धनादेश आणि होंडा कार बक्षिस स्वरुपात मिळाली होती. याचं कारची मालकी त्यांना आता मिळाली आहे. अंधेरी येथे झालेल्या शानदार समारंभात होंडा कार्स इंडियाचे पश्चिम विभागाचे प्रमुख आशीष कौल, सॉलिटेअर होंडाचे कृष्णा कचालिया यांनी अमृता-हिमांशुला जॅझच्या किल्ल्या सुपूर्द केल्या.