दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना तुम्ही रुपेरी पडद्यावर अनेकदा पाहिलं आहे. पण, अभिनयाव्यतिरिक्त हे कलाकार इतर व्यवसायांनाही प्राधान्य देतात. कोणाची एअरलाइन्स आहे तर कोणी रेस्तराँचे मालक आहेत. साइड बिजनेस करणाऱ्या कलाकारांबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.

नागार्जुन-
अभिनेता नागार्जुनने हैद्राबादमध्ये ‘एन-ग्रिल’ हे स्वतःचे रेस्तराँ सुरु केलेय. त्याचसोबत, त्याचे चायनिज रेस्तराँही असून, त्याचे नाव ‘एन एशियन’ आहे. याव्यतिरीक्त त्याने कार्पोटरेट हाउसचे इवेन्ट होस्ट करणारे कन्वेंशन सेंटरही सुरु केलेय.

राम चरण-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हिट चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता राम चरण ‘ट्रूजेट एअरलाइन’ कंपनीचा संचालक आहे. हैद्राबादमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना २०१३ साली करण्यात आलेली. साउथ व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि गोवा येथेही ही कंपनी सुविधा पुरवते.

वाचा : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

सूर्या
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सूर्याचा कोयंबटूर येथे पवनचक्की व्यवसाय आहे. याव्यतिरीक्त गार्मेंट एक्सपोर्ट व्यवसायातही तो कार्यरत आहे.

विजय-
अभिनेता विजयचे चेन्नईत लग्नाचे हॉल असून, त्याचे नाव ‘द मंडपम’ असे आहे. याव्यतिरिक्त तो समाजकार्यही करतो. त्याची ‘विजय मक्कल इयक्कम’ ही संस्था गरजूंना मदत करते.

पवन कल्याण</strong>
‘पवन कल्याण क्रिएटिव वर्क’ ही पवनची निर्मिती संस्था आहे. चित्रपटांच्या निर्मितीसोबतच तो समाजकार्यही करतो.

वाचा : ‘कांटा लगा..’ फेम ही अभिनेत्री आठवतेय का?

आर्या-
चेन्नईतील ‘शी सेल’ हॉटेलचा आर्या मालक आहे. याव्यतिरीक्त त्याची स्वतःची ‘ द शो पीपल’ ही निर्मिती संस्थासुद्धा आहे.

श्रुती हसन-
श्रुतीने ‘इसिड्रो’ ही निर्मिती संस्था सुरु केलीये. या कंपनीत शॉर्ट फिल्म्स, अॅनिमेशन फिल्म्स, व्हिडिओ रेकॉर्डिंगचे काम केले जाते.