नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाच्या निर्मितीला वर्ष होत आले असले तरी चित्रपटाची हवा कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर अनेक चित्रपटसृष्टीला या चित्रपटाच्या निर्मितीचे वेड लागले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची चर्चा थांबताना दिसत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाचा सर्वप्रथम कन्नडमध्ये रिमेक करण्यात आला आहे. ‘मनसु मल्लिगे’ या कन्नड भाषेतील रिमेकचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटातील गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सैराट’ चित्रपटाला वेगळे वळण देणाऱ्या ‘‘झिंग झिंग झिंगाट…’ या गाण्याची भाषा बदलली असली तरी, या गाण्याची लोकप्रियता किंचतही कमी झालेली नाही.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

मराठी झिंगाट गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातल्यानंतर ‘मनसु मल्लिगे’ या कन्नड चित्रपटातील झिंगाट गाणे अनेकांना वेड लावणार असे चित्र दिसते. मराठी भाषेतील शब्द नसले तरी अजय- अतुलचे संगीत आणि गाण्यातील आर्ची म्हणजेच रिंकूची झलक नेटिझन्सला वेड लावतआहे. ट्रेलरनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कन्नड भाषेतील गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.सैराटच्या रिमेकमध्ये रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटात ती संजू नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर परशाच्या भूमिकेत कन्नड चित्रपट सृष्टीतील निशांत तिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. ‘सैराट’पेक्षा अनेक बदल करुन या चित्रपटातील कॉलेज सीन चित्रित करण्यात आल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले होते. ‘मनसु मल्लिगे’ची हवा कर्नाटकासोबतच महाराष्ट्रातही तापत आहे. सैराटची कथा माहिती असल्यामुळे संवादांची अडचण जशी चित्रपट पाहण्यासाठी येणार नाही, अगदी तसेच गाण्याच्या बाबतीत देखील पाहायला मिळत आहे.

रिंकू राजगुरुचा हा केवळ दुसरा चित्रपट असला तरी सैराट चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार केले होते. तिच्यातील या स्टारडमचा फायदा कन्नड चित्रपटसृष्टीत कशा पद्धतीने उमटतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल. सैराट चित्रपटाच्या रिमेकविषयी बोलायचे तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील ‘सैराट’ चित्रपटाने वेड लावले आहे. बॉलिवडचा दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर देखील ‘सैराट’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्याच्या चित्रपटामध्ये नायिका-नायक कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.