नावाजलेल्या कलाकारांचे सोशल मीडियावर फेक अकाउंट काढायचे आणि त्यांच्या नावावरुन आक्षेपार्ह विधानं करणं हे काही नवीन नाही. वादग्रस्त विधानं ही त्या कलाकारानेच केली आहेत असा अनेकांचा समज होतो. त्यामुळे यातून वादही निर्माण होतात.
आपल्याकडे असेही गुणी कलाकार आहेत जे त्यांचं काम करत राहतात आणि सोशल मीडियापासून लांबंच असतात. पण तरीही त्यांच्या कामाने मोठे झालेले हे कलावंतही अशा सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचे बळी पडतात. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ही त्यातलीच नावं.
सोशल मीडियापासून हे दोन्ही कलाकार तसेच लांबच होते. पण, त्यांच्या नावाचा गैरवापर करुन फेसबूक, ट्विटरवर अकाऊंट्स उघडण्यात आली आहेत. शिवाय व्हॉट्सअॅपवर त्यांच्या नावाने सतत कोणते ना कोणते मेसेज सोशल मीडियावर फिरत असतात.
‘नाम फाउण्डेशन’साठी सुरु करण्यात आलेल्या बँक अकाऊंटचे चुकीचे नंबर टाकूनही पैसे लाटण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे आता या दोन्ही कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे अधिकृत अकाऊंट बनवले आहेत.
http://www.nanapatekar.co.in
https://www.facebook.com/nanapatekar
https://twitter.com/nanagpatekar

a lift stained due to paan spitting at bhopal Madhya Pradesh railway station photo goes viral on social media
“कधी सुधारणार लोकं?” पान थुंकून रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट केली अस्वच्छ, फोटो पाहून नेटकरी संतापले…
pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
prashant damle launches marathi ticket booking app name ticketalay
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त प्रशांत दामलेंची मोठी घोषणा! मराठमोळ्या ‘तिकिटालय’ ॲपचा शुभारंभ, जाणून घ्या…
ajit pawar
अग्रलेख: दादांचे पत्र!

ही नाना पाटेकर यांची अधिकृत अकाऊंट्स आहेत. याच अकाऊंटवरुन नाना ‘नाम फाऊंडेशन’बद्दलची माहिती वेळोवेळी मांडतील शिवाय इतर वैयक्तिक मतंही मांडतील. याव्यतिरिक्त कोणत्याही अकाऊंटशी त्यांचा संबंध नसेल असे त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/MakarandAnaspure/
http://www.makarandanaspure.in
https://twitter.com/AnaspureM

हे मकरंद अनासपुरे यांची अधिकृत अकाऊंट्स आहेत. सध्या मकरंद हे ‘नाम फाऊंडेशन’ची कामे आणि त्यासंदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी या अकाऊंट्सचा वापर करणार आहेत.

-मधुरा नेरुरकर