चित्रपटातील प्रणयदृश्य हा नेहमीच नाजूक विषय ठरला आहे. यामुळे चित्रपटांना सेन्सॉरची कात्री तर लागतेच पण, त्याचसोबत अशी दृश्ये करणाऱ्या कलाकारांना अनेकदा लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. ‘पार्श्ड’, ‘हेट स्टोरी ३’, ‘हंटर’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘बदलापूर’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांसारख्या अनेक चित्रपटांना याच कारणामुळे सेन्सॉरची कात्री लागल्याचे आपण पाहिलेय. यातील कलाकारांनी दिलेल्या प्रणयदृश्यांवरही बऱ्याच चर्चा रंगल्या. सध्या आगामी ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ चित्रपटाबद्दलही अशीच चर्चा केली जातेय. नवाजुद्दीन सिद्दीकी, बिदिता बाग आणि श्रद्धा दास यांच्या भूमिका असलेल्या ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ चित्रपटात प्रणयदृश्ये दाखविण्यात आली असल्यामुळे सेन्सॉरने चाळीसपेक्षाही अधिक दृश्यांवर कात्रा लावली आहे.

वाचा : सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानमधून सुटका केलेल्या ‘त्या’ मुलीवर येणार चित्रपट

कथेची मागणी असल्यामुळे अनेकदा कलाकार मंडळी प्रणयदृश्य चित्रीत करण्यास तयार होतात. पण, त्यावर त्यांच्या नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया असतील याचा कोणी विचार कधी केला आहे का? असाच एक प्रश्न नवाजुद्दीनला विचारण्यात आला. नवाजुद्दीन जेव्हा चित्रपटासाठी प्रणयदृश्य चित्रीत करतो तेव्हा त्याच्या पत्नीची काय प्रतिक्रिया असते? असे त्याला विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, ‘बायको शेवटी बायको असते मग ती माझी असो किंवा ओबामाची. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत प्रणयदृश्य करताना पाहणे कोणत्याच पत्नीला आवडणार नाही. त्यामुळे माझ्या पत्नीने अशी दृश्ये पाहिल्यावर रागावणे स्वाभाविक आहे. पण, त्यानंतर मी तिला समजावून सांगतो आणि ती ऐकतेही.’

वाचा : आणखी एक अभिनेत्री गुपचूप अडकली विवाहबंधनात

सेन्सॉर बोर्डाने ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ला लावलेल्या कात्रीवर नवाजुद्दीन म्हणाला की, ‘सेन्सॉरचे काम केवळ प्रमाणपत्र देण्यापुरते असावे ना की, सेन्सॉरशिप करणे. सेन्सॉरचे नवे अध्यक्ष प्रसून जोशी हे प्रतिभावान व्यक्ती आहेत. ते यावर नक्कीच चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे.’