भारतातले अशी अनेक गावं आहेत जिथे आजही वीज पोहोचलेली नाही किंवा शुद्ध पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण फिरावं लागतं. गावात वीज नाही, शहराला जोडणारे रस्ते नाही, शाळा नाही अशी परिस्थिती भारतातील अधिकाधिक खेड्यांमध्ये आजही दिसून येते. अनेकदा बजेटमध्ये आणि इतर वेळीही गावांच्या विकासासाठी मोठमोठे निधी बाजूला ठेवले जातात. पण त्या निधीचे पुढे काय होते हे मात्र कोणालाच कळत नाही.

फक्त देशातल्या खेड्यांसाठी बाजूला केवढा निधी ठेवला आहे याच्या बाता जोरजोरात मारल्या जातात. पण या सगळ्यात सातासमुद्रापारची अशी एक व्यक्ती आहे जी कोणताही गाजावाजा न करता एका गावाच्या सुधारणेसाठी कित्येक वर्ष पैसे पाठवत होती आणि त्याबद्दल कोणालाही काही माहित नव्हते.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
global capital market, samir arora, mutual fund, samir arora journey in market, samir arora and global market journey, samir arora work, helios mutual fund, alliance capital management, asset management comapanies, hdfc limited, hdfc bank, samir arora thoughts in hdfc merge,
बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅपर निकी मिनाज या गायिकेने एका गावात कम्प्युटर सेंटर, टेलरींगच्या संस्था, वाचनाचे कार्यक्रम होऊ शकतील अशी सोय आणिदोन विहीरी उभ्या केल्या आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्रामवरून गावातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारतातले हे गाव नक्की कुठले आहे याबद्दल मात्र तिने काहीच माहिती दिली नाही.

‘अशा प्रकारच्या गोष्टींचा मला फार अभिमान आहे. गेल्या काही वर्षांपासून मी या गावाला आर्थिक मदत करत आहे. आज इथे कॉम्प्युटर सेंटर, टेलरिंग संस्था, विहीरी आल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. पण अनेक ठिकाणी लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही मिळत नाही. मी येत्या काळात माझ्या इतर काही सामाजिक कार्याबद्दल तुम्हाला सांगेन.. तुमची इच्छा असेल तर तुम्हीही सहभागी होऊ शकता,’ असा मेसेज निकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले.

निकी अशा पद्धतीने गावकऱ्यांना मदत करत होती याची कोणालाच कल्पना नव्हती. निकीने स्वतःहूनही कधी याची वाच्यता केली नाही. त्यामुळे जेव्हा इन्स्टाग्रामवरची तिची पोस्ट पाहिली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.