सेलिब्रिटींच्या चाहत्यांचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांची झलक पाहण्याासाठी किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते वेडे होतात. गेल्या आठवड्यातील सनी लिओनीचा किस्सा याचं उत्तम उदाहरण आहे. कोचीमध्ये एका मोबाईल स्टोअरच्या उद्घाटनासाठी गेलेल्या सनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. तिला ओझरतं का होईना पाहण्यासाठी तिच्या कारमागे काही जण अक्षरश: वेड्यासारखे धावत होते. करिना कपूरसोबत नुकताच एक असा किस्सा घडला. यावेळी ती आणि तिच्यासोबत असलेले सर्व मंडळी थक्कच झाले.

वाचा : …म्हणून पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार इशा देओल

बेबो वांद्रे येथील एका ब्युटी पार्लरमध्ये रेग्युलर सेशनसाठी गेली होती. तेथून बाहेर पडताना तिच्या आजूबाजूला चाहत्यांची गर्दी झालीच होती. अशातच एक वृद्ध महिला करिनाच्या मागे धावू लागली. तिच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी ती वृद्ध महिला बेबोच्या मागे धावत होती. करिना आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. त्या महिलेसोबत तिने फोटो काढला. इतकेच नाही तर थोडा वेळ थांबून तिने त्यांच्याशी गप्पादेखील मारल्या. यावेळी करिनासोबत सोनम कपूरची लहान बहिण रियादेखील होती.

वृद्ध महिलेशी गप्पा मारत असताना सलॉन परिसरात गर्दीही जमली होती. आपल्या आवडत्या अभिनेत्रीसोबत फोटो काढल्याने ती महिलेलाही आनंद झाला.