रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे) झालेल्या ऑस्कर सोहळ्यात ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाचे वर्चस्व पाहायला मिळाले असले तरी, तब्बल १४ नामांकन मिळालेल्या या चित्रपटाला केवळ पाच पुरस्कार पटकाविण्यात यश आले. प्रसिद्ध अँकर जेमी किमेलच्या सूत्रसंचालनात रंगलेल्या या सोहळ्याची सुरुवात जस्टिन टिम्बरलेकच्या गाण्याने झाली. 'ला ला लॅण्ड' चित्रपटातील 'सिटी ऑफ स्टार्स'वरील जॉन लेजेण्डच्या सादरीकरणाने सोहळ्याला चारचाँद लावले. हा सोहळा अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांवर तोंडसुख घेणारे सर्वात मोठे व्यासपीठ ठरण्याचीही शक्यता होती. मात्र, या सोहळ्यात फारसे तसे काही घडले नाही. दरम्यान, सूत्रसंचालक जिमी किमेल याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवरून डिवचण्याचा प्रयत्न मात्र केला. नेहमी ट्विटरवर नको तेवढे सक्रिय असणारे ट्रम्प आज कुठे आहेत, असा टोमणा मारत अध्यक्ष महोदय जागे आहात का?, असे ट्विट किमेलने यावेळी केले. अशा प्रकारे छोट्या मोठ्या विनोदांनी किमेलने ऑस्कर सोहळ्यात रंगत आणली. तसेच, पुरस्कार सोहळा सुरु असतानाच करण्यात उपस्थितांवर कॅन्डीजचा केलेला वर्षाव नेत्रसुख देणारा होता. ऑस्कर पुरस्कार २०१७ विजेत्यांची संपूर्ण यादी सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'मूनलाइट' (Moonlight) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डेमिअन चॅजेल (ला ला लॅण्ड) (Damien Chazelle) सर्वोत्कृष्ट अभिनेता- केसी अफ्लेक (Casey Affleck) (मँचेस्टर बाय द सी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- एमा स्टोन (Emma Stone) (ला ला लॅण्ड) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- विओला डेव्हिस (Viola Davis) (फेन्स) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- महेरशाला अली (Mahershala Ali) ('मुनलाइट') सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट- असगर फरहादी ('द सेल्समन') सर्वोत्कृष्ट साउण्ड एडिटिंग- सिल्वेन बेलमेअर (अरायव्हल) सर्वोत्कृष्ट डॉक्युमेण्ट्री फिचर- 'ओजे मेड इन अमेरिका' सर्वोत्कृष्ट मेकअपमन- 'सूसाइड स्क्वॉर्ड'मध्ये जोकरचा मेकअप करणा-या चमूला हा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संकलन : ‘हॅकसॉ रिज’ (Hacksaw Ridge) सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट : 'द जंगल बुक' सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिआइन- 'डेव्डिड वॅस्को' (ला ला लॅण्ड) सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म- 'झूटोपिया' सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म- 'पायपर'