यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला केवळ दोन दिवस बाकी राहिले आहेत. बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील ८९ व्या अॅकॅडमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘क्वांटिको’ अभिनेत्री प्रियांकाने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर करून ती ऑस्कर सोहळ्याला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे. आता तुम्ही म्हणाल तिने हॉलीवूड गाठले आहे तर ती पुरस्कार सोहळ्याला जाणारच ना.. बरोबर आहे तुमचं. पण, ती ज्या व्यक्तीसोबत जाणार आहे त्या व्यक्तिचे नाव जाणून तुम्हीही थक्क व्हाल. प्रियांका चक्क मिक जॅगरसोबत कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी निघालीये. तिने टेक ऑफ वेळचा मिकसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, ती या दिग्गज अभिनेत्यासोबत का होती, यामागचे कारण तिने सांगितलेले नाही.

प्रियांका चोप्रा दुस-यांदा हॉलीवूडमधील या सर्वात मोठ्या सोहळ्याला हजेरी लावत आहे. गेल्या वर्षीही, या ‘बेवॉच’मधील अभिनेत्रीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तसेच, तिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी, पांढ-या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवलतरलेल्या प्रियांकाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. एकंदरीत तिचा लूक आणि तिने घातलेली ज्वेलरी यामुळे सर्वांच्याच नजरा तेव्हा तिच्यावर खिळल्या होत्या. ऑस्कर सोहळ्यानंतर होणा-या पार्टीतही तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, प्रियांकासोबत ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोण हीदेखील तिच्यासोबत रेड कार्पेटवर दिसेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, नुकत्यात एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाने ती सोहळ्याला जाणार नसल्याचे सांगितले.

अलीकडच्या काळात हॉलीवूडमधील ब-याच पुरस्कार सोहळ्यांना प्रियांकाने हजेरी लावली. तिला दोनदा ‘पिपल्स चॉइस पुरस्कारा’नेही गौरविण्यात आले. नुकत्याच झालेल्या ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ सोहळ्यालाही तिने हजेरी लावली होती. लवकरच ती ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलीवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्यासह ड्वाइन जॉन्सन (द रॉक), झॅक एफ्रॉन यांच्याही भूमिका आहेत. मात्र, सध्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाचा लूक कसा असणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ऑस्कर पुरस्कार २०१६ सोहळ्यातील प्रियांकाचे फोटो

Priyanka Chopra
ऑस्कर पुरस्कार २०१६ च्या रेड कार्पेटवरील प्रियांकाचा लूक

priyanka3_rtr

त्यावेळी प्रियांकाने डायमंडचे कानातले आणि हातात चंदेरी रंगाची क्लच घेऊन तिचा लूक पूर्ण केला होता. झुहेर मुराद याने हा गाऊन डिझाइन केलेला.

Priyanka Chopra
कॅलिफोर्नियातील डॉल्बी थेटरमध्ये ऑस्कर पुरस्कार २०१६ सोहळा पार पडला होता.

pc_820_rtr
प्रियांकाने हा फोटो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करत, हिरे हे मुलींचे जीवलग मित्र असतात अशी त्याला कॅप्शन दिली होती.