‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्स’ या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा, सन्मानाचा पुरस्कार समजला जातो. चित्रपटसृष्टीशी संबंधित प्रत्येक कलाकार व्यक्ती या पुरस्काराची उत्कंठतेने वाट पाहते. दोनशे पेक्षा जास्त देशांत थेट प्रक्षेपण होणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्याचे यंदाचे हे ८९वे वर्ष. या दरम्यान, कित्येक पुरस्कार आले पण ऑस्करचे महत्त्व, त्याची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढतच गेली. अशा या पुरस्कार सोहळ्यात प्रदान केल्या जाणाऱ्या सन्मानचिन्हासंदर्भात थोडक्यात घेतलेला हा आढावा….

वाचा :  Oscar 2017 : ‘ऑस्कर पुरस्कारा’चे हे नियम माहित आहेत का ?

वाचा :  Oscar 2017: मुंबईचा सनी पवार ‘लायन’ चित्रपटाचा खरा चेहरा

काळ्या धातूच्या पायावर सोन्याचा मुलामा दिलेल्या ब्रिटॅनिअम (Brittannium) धातूत तयार केलेल्या ‘ऑस्कर पुरस्कार’ सन्मानचिन्हाचे अधिकृत नाव ‘अॅकॅडमी अॅवॉर्ड फॉर मेरीट’ असे आहे. या सन्मानचिन्हाची उंची ३४ सेंमी आणि वजन ३.८५ किग्रॅ असते. या मानचिन्हाचे स्वरुप हातात ‘क्रुसेडर्स तलवार’ घेऊन उभ्या असलेल्या सरदाराची कलात्मक मूर्ती असे आहे. सन्मानचिन्हाच्या पायाखाली आपल्याला पाच ‘स्पोक’ दिसतात. हे स्पोक ‘लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि तंत्रज्ञ’ यांचे प्रतिनिधित्व करतात.

वाचा :  Oscars 2017 : ऑस्कर नामांकन मिळालेले हे चित्रपट पाहाच….

वाचा : .. या १५ भावंडांनी मिळवले ऑस्कर पुरस्कार

‘एम.जी.एम.’ चा कलादिग्दर्शक ‘सेड्रिक गिबन्स’ आणि ‘जॉर्ज स्टॅन्लेने’ यांनी मानचिन्हाचे डिझाइन तयार केले आहे. मेक्सिकन चित्रपट दिग्दर्शक ‘एमिलिओ अल इंडिओ फर्नांडिस’ याची मूर्तीसाठी मॉडेल म्हणून निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या मूर्तीची प्रतिकृती मातीचा वापर करुन तयार करण्यात आली. पण त्यानंतर खरे मानचिन्ह ९२.५ टक्के जस्त आणि ७.५ टक्के तांबे त्यावर सोन्याचा मुलामा या धातूत तयार केले गेले.

ऑस्कर पुरस्कार विजेत्या व्यक्तिला वा त्याच्या वारसदारांना सन्मानचिन्ह विकायचे असेल तर त्यांनी हा पुरस्कार अॅकॅडमीला केवळ ‘१ अमेरिकन डॉलर’ या किंमतीत परत करावा असा नियम सन १९५० नंतर तयार करण्यात आला. पुरेसे कायदेशीर संरक्षण नसल्याने काही वेळा ही मानचिन्ह लिलावात सहा अंकी किंमतींना विकली गेलेली आहेत. परंतु विकत घेणाऱ्यांनी हे सन्मानचिन्ह नंतर परत केली. एखाद्या पुरस्कार विजेत्या कलाकाराने कोणत्याही कारणात्सव पुरस्कार नाकारला तर ते सन्मानचिन्ह तसेच ठेवले जाते आणि तो पुरस्कार अन्य कोणालाही प्रदान केला जात नाही.