गेल्या गुरुवारी सनी लिओनी एका मोबाईल स्टोअरच्या उद्घाटनासाठी कोचीला गेली होती. याठिकाणी तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी अशी काही गर्दी केली की परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. सनीला उद्घाटनासाठी बोलावणं त्या दुकानदाराला चांगलंच महागात पडलंय असं म्हणावं लागेल. कारण याप्रकरणी आता मोबाईल स्टोअरच्या मालकासह इतर १०० जणांविरोधात कोची पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सनीला पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेड्यासारखे तिच्या कार मागे धावत होते. पोलिसांना तेथील वाहतुकीवर नियंत्रण मिळवणं अवघड झालं होतं. कोचीतील एम.जी.रो़डवर सनीला पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीवर नियंत्रण मिळवणं पोलिसांना कठीण झालं होतं. कित्येक तास रस्ता अडवल्याने २८३ आणि ३४ कलमान्वये मोबाईल स्टोअरचा मालक आणि इतर १०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Heavy Vehicles, Banned, Pune Nagar Road, During Rush Hours, Metro and Flyover Construction,
पुणे : नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी
School Boy Kidnapped, pune, 50 Lakhs Ransom, Safely Rescued, police, Kidnappers, search,
पुणे : शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू

वाचा : बॉलिवूडमध्ये आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकण्यास सज्ज

गुरुवारी सनीने तिच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर गर्दीची झलक दाखवणारा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता. ‘चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाहीत. मी त्यांचं माझ्यावरी प्रेम आणि सहकार्य पाहून फारच खूश आहे. देवाची नगरी असणाऱ्या केरळला मी कधीच विसरणार नाही. धन्यवाद,’ असं तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाले. त्यावरुन गमतीशीर मिम्सही सोशल मीडियावर शेअर होऊ लागले. कोचीमध्ये सनीला पाहण्यासाठी झालेली गर्दी आणि बराक ओबामा यांच्या शपथविधी सोहळ्याला झालेली गर्दी यांची तुलना करणारा मिम सोशल मीडियावर खूप गाजला.