‘प्यारी बिंदू’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर सध्या परिणीती चोप्रा थोड्या मजा मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ती किती मस्करीच्या मूडमध्ये आहे याचा अंदाज येतो. खरंतर २२ ऑक्टोबरला तिचा वाढदिवस होता. त्या दिवशी तिच्या ट्विटर अकाऊंटवर तिच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा दिल्या. तिच्या याच चाहत्यांपैकी एक म्हणजे ‘ढिशूम’ स्टार वरुण धवन…

वरुण धवनने परिणीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना #जानेमन असं म्हटलं आहे. यापुढे तो म्हणाला की, हॅपी बर्थडे जानेमन, नेहमी अशीच राहा आणि कधी तुझ्या घरी मला चहासाठी घेऊन जा.. तिला जानेमन लिहिण्याचे खरे कारण म्हणजे ‘ढिशूम’ या सिनेमामध्ये जानेमन आह… हे आयटम साँग परिणीतीने वरुणसोबत केले आहे. हे परिणीतीचं पहिलं आयटम साँग होतं. या गाण्यात दोघांनी पहिल्यांजा एकत्र काम केलं होतं. या गाण्याला अनेकांची पसंतीही मिळाली होती. वरुणच्या या ट्विटला उत्तर देताना परिणीतीनेही तेवढंच मजेशीर उत्तर दिलं आहे. माझ्या घरी लवकर ये जानेमन, धन्यवाद.

याआधी परिणीतीने आपल्या कमनीय बांध्याचे श्रेय वरुणला दिले होते. मुंबईमध्ये जानेमन आह.. या गाण्याच्या प्रदर्शनाच्यावेळी परिणीतीने सांगितले होते की तिचे हे अॅब्स वरुणमुळेच झाले आहेत. मी अशी फिगर बनवण्यासाठी मेहनत घेत होती आणि मला वरुणला माझे अॅब्स दाखवून द्यायचे होते. त्याने मला या गाण्यासाठी विचारले होते आणि मी त्वरीत या गाण्याला होकारही दिला. आम्हाला ९० च्या दशकात ज्या पद्धतीचे नृत्य असते तशा पद्धतीचे नृत्य करायचे होते. करिश्मा आणि गोविंदा हे आमचे प्रेरणा स्थान होते.