अभिनेता जॉन अब्राहमला आपण याआधी पोलीस अधिकारी आणि जवानाच्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. त्यानंतर आता हा अॅक्शन हिरो पुन्हा एकदा धडाकेबाज भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. जॉनने त्याच्या आगामी ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट १९९८ साली पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचणीवर आधारित आहे.

वाचा : .. म्हणून ऐश्वर्या-सलमानचा झाला होता ब्रेकअप

जॉन अब्राहमने ‘परमाणू’ चित्रपटाचा फर्स्ट लूक ट्विट केला असून त्याला कॅप्शन दिली आहे. यात त्याने लिहिलंय की, सर्वात मोठ्या आण्विक चाचणीवर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना मला खूप आनंद होतोय. काही दिवसांपूर्वीच जॉनने चित्रीकरणाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सेटवर गेल्यानंतरही त्याने पहिला दिवस….. परमाणू …. द स्टोरी ऑफ पोखरण. आतापर्यंत आपण केलेली सर्वात मोठी चाचणी, असं ट्विट केलं होतं.

दरम्यान, ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्णपणे पोखरण येथे होणार नसून ते जैसलमेर, राजस्थान येथे होईल. चित्रपटाचा काही भाग पोखरणमध्ये चित्रीत होईल. पोखरण किल्ला, आरटीडीसी, अदा बाजार, गांधी चौक मुख्य मार्केट आणि गोमत रेल्वे स्थानक या काही मुख्य ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार आहे.

वाचा : जाणून घ्या ‘ज्युनियर जी’मधून प्रसिद्धीस आलेला हा बालकलाकार सध्या करतोय तरी काय?

क्रिअर्ज एण्टरटेन्मेन्ट आणि जेए एण्टरटेन्मेन्ट ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. जॉन व्यतिरीक्त यात डायना पेन्टी आणि बोमन इराणी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी ८ डिसेंबरला प्रदर्शित होईल. याआधी अभिषेक शर्माने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

parmanu-john

parmanu-shot