‘पार्टिशन: १९४७’ म्हणजेच फाळणीची कथा…. त्या एका रेषेचे कहाणी ज्यामुळे दोन देश विभागले गेले. एक होता भारत तर दुसरा पाकिस्तान. गुरिंदर चढ्ढा याने चित्रपटाची कथा लिहण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. या चित्रपटाची कथा भारताचे शेवटचे वॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर आधारित आहे. स्वतंत्र भारतासाठी माउंटबॅटन यांना बोलविण्यात येते. लॉर्ड माउंटबॅटन आणि त्यांच्या पत्नी लेडी एडविना यांच्या मनात भारताप्रती असलेल्या भावना यात चित्रीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, चित्रपटात आलिया (हुमा कुरेशी) आणि जीत कुमार (मनीष दयाल) यांच्यामध्ये फुलणाऱ्या प्रेमाची कथाही दाखविण्यात आली आहे.

वाचा : बॉलिवूडमधून अचानक गायब झालेली फाल्गुनी नवरात्रीत कमवते कोट्यवधी रुपये

चित्रपटाच्या कथेव्यतिरीक्त त्यातील संवाद हे नक्कीच लक्षवेधी ठरत आहेत. हे संवाद ऐकल्यावर तुम्हीही चित्रपट पाहण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता आहे. चित्रपटातील ते संवाद पुढीलप्रमाणे.

‘नए मुल्क अमन में पैदा नहीं होते’

‘हम हिंदुस्तान को उसकी आझादी लौटाने आए थे, न कि उसके टुकड़े करने’

‘हम सभी भाइयों की आत्माएं एक हैं.. धर्म के नाम पर हमें बांटना ईश्वर की मर्जी के खिलाफ है’

‘तुम आने वाला कल ला रहे हो.. ‘हम’ ला रहे हैं.. तो कहीं बात और बिगड़ न जाए..’

‘हमारा मकसद है हिन्दुस्तान को आझादी दिलाना.. जितना शांतिपूर्वक उतना अच्छा’

‘कभी कभार सर्जरी ही मरीज को बचा सकती है’

‘हम हिंदोस्तान को उसकी आझादी लोटाने आए है, ना की उसके तुकडे करने’

वाचा : असा साजरा झाला सचिन पिळगावकर यांचा ६० वा वाढदिवस