अभिनेत्री रिया सेनने पारंपारिक पद्धतीनुसार प्रियकर शिवम तिवारी याच्याशी काही दिवसांपूर्वीच लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आता पहिल्यांदाच समोर आले आहेत. खासगी सोहळ्यात रियाने आपल्या प्रियकराशी बुधवारी बंगाली विवाहपद्धतीनुसार लग्न केले.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यात पार पडलेल्या विवाहसोळ्याला या दोघांचे नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित राहिले होते. रियाची बहिण आणि अभिनेत्री रायमा सेन शर्मा हिने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, रिया आणि शिवम यात पारंपारिक बंगाली वधू- वराच्या पोशाखात दिसतात. या फोटोंमध्ये रियाची आई मून मून सेनही दिसते.

वाचा : …म्हणून सलमान खानच्या घरी यावर्षी बाप्पा येणार नाही

quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
After Shreyas Iyer was ruled out of Ranji Trophy 2024 due to back pain, the NCA made waves the next day by declaring him fit.
Ranji Trophy 2024 : रणजीपासून दूर राहण्यासाठी श्रेयसची पाठदुखीची खोटी तक्रार? एनसीएकडून पूर्णपणे तंदुरुस्त घोषित
Underworld don Ameer Balaj Tipu
लग्नाची पार्टी, धाड धाड गोळ्यांचा अक्षरशः पाऊस आणि डॉन आमीर ट्रकांवालाची हत्या, जाणून घ्या इनसाईड स्टोरी
man committed suicide mumbai
मुंबई : मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या

अभिनयाचा वारसा असलेल्या कुटुंबातून आलेल्या रियाच्या आजी सुचित्रा सेन या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. गेल्या काही दिवसांपासून रियाच्या लग्नाची चर्चा होती. अखेर बुधवारी तिने कोणालाही खबर लागू न देता गुपचूप विवाह केला. ‘अपना सपना मनी मनी’ अभिनेत्री रिया सेनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. दरम्यान, रिया गरोदर असल्यामुळे तिने घाईघाईत लग्न केल्याची चर्चा सिनेवर्तुळात सुरु आहे.

वाचा : झोपलेल्या कुत्र्याला विटेने मारल्याने आलिया भडकली

रियाने ‘स्टाईल’, ‘झंकार बिट्स’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘तेरे मेरे फेरे’ या हिंदी तर तमिळमध्ये ‘ताज महल’ चित्रपटात काम केले आहे. याव्यतिरीक्त तिने बऱ्याच बंगाली चित्रपटांमध्येही काम केलेय. काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूरावलेली रिया शेवटची अग्निदेव चॅटर्जीच्या ‘डार्क चॉकलेट’ चित्रपटात दिसली होती. यात तिने शीना बोरावर आधारित व्यक्तिरेखा साकारली होती. शिवमला फॉटोग्राफीची आवड आहे. फिरण्याची आवड असल्यामुळे हे दोघंही अनेकदा बाहेर फिरायला गेले आहेत. या दोघांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर नजर टाकल्यास त्यांच्या ट्रॅव्हल डायरीचे बरेचसे फोटो पाहायला मिळतात.

दरम्यान, रिया आता ऑल्ट बालाजीच्या ‘रागिनी एमएमएस २.२’ या वेबसीरिजमध्ये काम करत आहे. सिमरन आणि रागिनी या दोघींभोवती वेबसीरिजची कथा आधारित आहे.