शाळा सिनेमा मराठी सिनेसृष्टीला बरचं काही देणारा ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटाचा अध्याय लिहिताना या चित्रपटाच्या निमित्ताने सुजय डहाके नावाचा दूर दृष्टी असलेला दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. ‘शाळा’, ‘आजोबा’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर सुजय डहाके ‘फुंतरु’ हा चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला
मराठीत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करण्यात येत असून हा एक साय फाय (सायन्स फिक्शन) चित्रपट आहे.  ‘फुंतरू’ मध्ये केतकी माटेगावकरसह बालक-पालक’मधल्या भाग्याची भूमिका साकारणारा अभिनेता मदन देवधर झळकणार आहे.  या चित्रपटातून केतकी आणि मदन हे दोघे अनाया आणि विरा या व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. इतकेच नाही पण या दोघांच्याही लूकमध्ये त्यांच्या भूमिकेनुसार विशेष बदल करण्यात आले आहेत. केतकीचा लूक तर आपण पोस्टरमध्ये पाहिलाच. पण मदनचा एक वेगळाच लूक आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहावयास मिळतो. यातला केतकीचा डॉल लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतोय. केतकीचा हा लूक साकारलाय आघाडीचा मेकअपमन विनोद सरोदे याने. पण या डॉल लूकसोबतचं केतकीचा आणखीन एक लूक तुमचे लक्ष वेधून घेईल. त्यासाठी हा ट्रेलर बघा.