गेले काही महिने चित्रपटांमध्ये रमलेला अभिनेता वैभव तत्त्ववादी पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटांमध्ये व्यग्र असतानाही मालिकेवरचे त्याचे प्रेम कमी झालेले नाही. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘प्रेम हे’ या नव्या मालिकेच्या शुभारंभाच्या भागात वैभव दिसणार आहे. ‘रुपेरी वाळूत’ असे या भागाचे शीर्षक असून त्यात वैभवबरोबर तेजश्री प्रधानची महत्त्वाची भूमिका आहे. ही जोडी पहिल्यांदाच मालिकेच्या निमित्ताने एकत्र आली आहे.

nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

‘माझे मालिकांवरील प्रेम कधीच कमी होणार नाही. मालिकांनी मला खरी ओळख मिळवून दिली आणि घराघरात प्रेक्षकांपर्यंत मला पोहोचवले. सध्या चित्रपटांमुळे मालिके च्या चित्रीकरणासाठी सलग वेळ देता येत नाही. पण जेव्हा ‘झी युवा’ने ‘प्रेम हे’ या मालिकेच्या प्रेमकथेबद्दल विचारले तेव्हा मी लगेच होकार दिला. छोटेखानी भाग असल्याने त्याचे चित्रीकरण मला करता आले, असे वैभवने सांगितले. या मालिके त तो पहिल्यांदाच तेजश्री प्रधानबरोबर काम करतो आहे. मात्र आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, अशी माहिती वैभवने दिली. आमच्या मैत्रीविषयी फार कोणाला माहिती नाही. खूप वर्षांपासून आम्ही एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर या मालिकेमुळे हा योग जुळून आला, असेही त्याने सांगितले. अल्लड वयापासून वयस्कर वयातील प्रेमापर्यंतच्या छटा ‘प्रेम हे’ या मालिके तून पाहायला मिळणार आहेत. तुमच्या आमच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, असे सांगतानाच या मालिकेच्या पहिल्याच भागात काम करायला मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. ‘रुपेरी वाळूत’ असे या पहिल्या भागाचे नाव असून यात ग्रामीण भागातील प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे त्याने सांगितले. ग्रामीण भागातील अनेक प्रेमकथा काही ना काही कारणाने अपूर्ण राहतात. अशाच एका वळणावर घडलेली प्रेमकथा यात पाहायला मिळणार असून २७ फेब्रुवारीपासून रोज रात्री ९ वाजता ‘प्रेम हे’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.