ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्राने दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. दीपिका मात्र ऑस्करच्या पार्ट्यांमध्येच अधिक दिसली. दीपिका आणि प्रियांका या पुरस्कार सोहळ्याच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहणार हे कळल्यानंतर त्यांच्या लूकबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. अफ्टर पार्टीमध्येही दीपिका आणि प्रियांकाने त्यांचा जलवा दाखवला.

या अफ्टर पार्टीमध्ये दीपिका आणि प्रियांका दोघींनी काळ्या रंगाला पसंती दिली होती. प्रियांकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन केस मोकळे सोडले होते तर दुसरीकडे दीपिकाही काळ्या आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये मनमोहक दिसत होती. या दोघींसाठी हे वर्ष फारच महत्त्वपूर्ण आणि यशाचे होते. दीपिकाचा ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज या सिनेमाने जगभरात चांगली कमाई केली. तर प्रियांकाचाही बेवॉच हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याशिवाय प्रियांकाला क्वांटिको मालिकेमुळे सलद दुसऱ्यांदा पिपल्स चॉईस हा पुरस्कारही मिळाला.

https://www.instagram.com/p/BRAgSAAFgjk/

https://www.instagram.com/p/BRAf82UhS_z/

https://www.instagram.com/p/BRAfdd1FUGZ/

https://www.instagram.com/p/BRAi9CcDxtt/

https://www.instagram.com/p/BRArnBWAC4f/

८९ व्या अॅकॅडमी पुरस्कार सोहळ्यात ती बेवॉर्चमधील सह-कलाकार ड्वेन जॉनसन अर्थात द रॉर याच्यासोबत झळकली. ९० च्या दशकातली सर्वात प्रसिद्ध टीव्ही मालिका म्हणून बेवॉर्चची ओळख आहे. या मालिकेवर आधारीतच हा सिनेमा आहे. इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार दीपिका ऑस्करच्या रेड कार्पेट कार्यक्रमात सहभागी नव्हती. तर प्रियांकाने सिल्वर राल्फ आणि रुसो यांनी डिझायन केलेला ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये प्रियांका मनमोहक आणि मादक दिसत होती. असे म्हटले जाते की प्रियांकाचा हा ड्रेस सुमारे ५० लाख रुपयांचा होता.

https://www.instagram.com/p/BRAog4ph4tk/