बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप व्यग्र आहे. खरं तर सध्या तिच्याजवळ कुठलाही बॉलिवूड चित्रपट नाही. मात्र तिच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे बॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीचं काम जोरात सुरु आहे. या व्यग्र वेळापत्रकाचा परिणाम तिच्या झोपेवर झालाय.

प्रियांकाने स्वत: ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत तसं म्हटलंय. विशेष म्हणजे झोप उडण्याचं कारणही तिला कळेनासं झालंय. ‘जेव्हा मला झोप येत नाही तेव्हा डोक्यात अनेक विचार येत असतात. हा नेमका जेटलॅगचा (विमान प्रवासामुळे येणारा ताण) परिणाम आहे की थकवा आहे हे मला कळत नाहीये,’ असं तिने ट्विट केलंय.

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर ती निर्मिती क्षेत्रातही उतरली. त्यामुळे तिच्यावरील कामाचा ताण वाढणं साहजिक आहे. अशातच तिला अनेकदा परदेश वारी करावी लागते. नुकतीच ती मुंबईला परतली आहे. मात्र व्यावसायिक कारणासाठी की वैयक्तिक कारणासाठी ती भारतात परतली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

वाचा : अनुराग कश्यप फक्त प्रसिद्धीसाठी वाद निर्माण करतो; निहलानींचा आरोप

हॉलिवूडच्या प्रोजेक्ट्समधून थोड्या दिवसांची सुट्टी घेऊन ती देशात परतली असली तरी तिचं इथलं वेळापत्रकंही तितकंच व्यग्र असणार आहे. याच धावपळीमुळे तिची झोप उडाली आहे असं म्हणायला हरकत नाही.