कॉफी विथ करण हा शो जितका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे तितकीच त्याची सेलिब्रिटींमधली ‘क्रेझ’ आहे. त्यामुळेच कदाचित या शोबद्दल खुद्द सेलिब्रिटी देखील अपडेट राहतात.

सध्या आपल्या क्वांटिको आणि बे वॉच साठी अमेरिकेत असलेली प्रियांका चोप्रा भारतात येणार आहे. भारतातील कामे आटोपण्यासाठी तिचा प्रयत्न असणार असल्याची माहिती तिच्या निकटवर्तियांनी दिली आहे.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया

कॉफी विथ करणच्या पाचव्या हंगामासाठी ती सज्ज झाल्याचे तिने एका ट्विटद्वारे घोषित केले आहे. करणच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी सज्ज आहे का? ते तुम्ही करणलाच विचारा असा प्रश्न तिने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन तिच्या चाहत्यांना विचारला आहे. आता ती या शोमध्ये एकटी येणार आहे की तिच्यासोबत आणखी कुणी असणार आहे याबद्दल निश्चित माहिती मिळाली नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये ज्याही टॉक शोमध्ये प्रियांका गेली तो शो तिने गाजवला. जिम्मी फॅलनचा शो असो वा अॅलन डी जेनेरसचा शो असो तिने आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने सर्वांचीच मने जिंकली.

जिम्मी फॅलनच्या शोमध्ये त्याने तिच्याशी चिकन विंग खाण्याची स्पर्धा लावली होती. तू हे चॅलेंज स्वीकारू शकतेस का असे त्याने विचारले. तिने त्याला होकारार्थी उत्तर दिले. तुझा डायटिंग वगैरेचा तर काही प्रश्न नाही ना असे त्याने तिला विचारलं तेव्हा आपण सरळ स्पर्धेलाच सुरुवात करू असे हजरजबाबी प्रियांकाने म्हटले. जेव्हा या स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात झाली त्यानंतर प्रियांकाने जिम्मीला सहज हरवले.

अॅलन डी जेनेरसच्या शोमध्ये तर तिने कमालच केली. मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये केलेली धमाल तिने तिला सांगितली. इतकेच नव्हे तर मिस वर्ल्डच्या स्पर्धक हातांच्या मुद्रा कशा करतात हे तिने तिला शिकवले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अॅलनला जेव्हा ते जमले नाही तेव्हा अॅलन कंटाळली आणि म्हणाली कदाचित तुम्ही लोक सर्व चुकीच्या पद्धतीने करत आला आहात.

जिम्मी किमेल आणि चेलसी हॅंडलरच्या शोमध्येही तिने आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची छाप सोडली. त्यामुळेच की काय इतर कोणत्याही सेलेब्रिटीपेक्षा प्रियांकाच्या कॉफी विथ करण शोची चर्चा सर्वाधिक आहे.