बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मंगळवारी न्यूयॉर्क येथे झालेल्या एका कार्यक्रमात अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना खडे बोल सुनावले. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लिम स्थलांतरितांना अमेरिकेत येण्यापासून बंदी घातली पाहिजे, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर प्रियांकाने सर्व लोकांना अशाप्रकारे एकाच तराजुत तोलणे मागासलेपणाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. दहशतवादाशी लढणे हे दिवसेंदिवस जटील होत असताना तुम्ही अशाप्रकारे दहशतावादाचा चेहरा निश्चित करू शकत नसल्याचे प्रियांकाने म्हणाली. ती न्यूयॉर्कमधील ‘टाईम १००’ गाला या कार्यक्रमाच्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होती. ‘टाईम’ नियतकालिकाने जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये प्रियांकाचा समावेश करण्यात आला आहे.