गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) भारत आणि अमेरिकेतील प्रवासामुळे कसरत करावी लागत आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही प्रियांकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ही राष्ट्रीय पुरस्कार अभिनेत्री भावूक झाली किंवा रागावली तरीही ती ‘देसी’च असते. कारण, त्यावेळी कोणताही भाव व्यक्त करताना तिच्या तोंडातून प्रथम देसी शब्दच बाहेर पडतात. मी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तरी मी मनाने भारतीयच असते, असे प्रियांकाने म्हटले आहे.

‘जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तरी मी मनाने भारतीयच’बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांकाने ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेत अॅलेक्स पॅरिशची तर ‘बेवॉच’ चित्रपटात व्हिक्टोरिया लीड्स ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. प्रियांका ‘बेवॉच’च्या प्रसिद्धीसाठी दहा दिवसांसाठी सध्या भारतात आली आहे. एका मुलाखतीवेळी तू साकारलेल्या अॅलेक्स किंवा व्हिक्टोरिया या विदेशी व्यक्तिरेखांचा तुझ्या व्यक्तिमत्वावर कधी परिणाम झाला का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. याचे उत्तर देताना प्रियांका म्हणाली की, ‘प्रत्येकवेळी माझ्याबाबतीत असे घडत असते. कल्पना करा, मी ‘क्वांटिको’च्या पहिल्या सिझनदरम्यान ‘बाजीराव मस्तानी’चे चित्रीकरण करत होते. त्यामुळे त्यावेळी अॅलेक्सवर माझ्या (प्रियांकाच्या) व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत असल्याचे मला स्पष्टपणे जाणवत होते.’

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
apple sent alert emails to iphone users
काही भारतीयांच्या ‘आयफोन’मध्ये स्पायवेअर असू शकतं; अ‍ॅपलची धोक्याची सूचना!
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

[jwplayer wYl1v5PG]

‘बऱ्याचदा शूटिंगदरम्यान मी अॅलेक्सचे संवाद भारतीय अंदाजात बोलायचे. तेव्हा अॅलेक्स एक अमेरिकन असल्याची आठवण माझे कोच मला करून द्यायचे. मी भावूक होते किंवा रागात असते तेव्हा मी देसी बनते आणि भारतीय अंदाजात बोलू लागते. मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी मनाने पूर्णत: भारतीयच आहे, असेही प्रियांकाने म्हटले.

प्रियांकाने ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटातून मराठी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिच्या निर्मिती अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यानिमित्त प्रियांकाने शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ‘व्हेंटिलेटर’च्या टीमसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी पार्टीला उपस्थित होते.