‘क्वाटिंको’ या मालिकेमधून यशाच्या शिखरावर पोहचलेली बॉलीवूडच्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने आता ‘क्वाटिंको’च्या दुस-या सिझनच्या चित्रिकरणासाठी सुरूवातही केली आहे. भारतात तर तिचे अनेक चाहते आहेतच शिवाय आता अमेरिकेतही तिचा चाहता वर्ग वाढत आहे.
प्रियांकाने ‘एफफपी’ या वृत्त संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, मला स्वतःला कोणत्याही साच्यात बांधून ठेवायला आवडत नाही. मी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळे त्या नावाला साजेसंच काम मला हॉलिवूडमध्ये करायचं आहे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही.
मला बॉलिवूडमध्ये अजून काम करायचं आहे, पण त्याचबरोबर मला खूप मुलांची आईही व्हायचंय. यात मी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असंही ती पूढे म्हणाली.
कोणी ‘मिस्टर राइट’ मिळाला का असा प्रश्न विचारला असता. मी अजूनही त्याच्या शोधात आहे असं ती म्हणाली.
सध्या क्वांटिकोच्या दुसऱ्या सिझनच्या शुटिंगला सुरूवात झाली असून नुकताच तिने पहिल्या दिवसाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या मालिकेचे निर्माते जोश सफरान यांच्या मते, पुढच्या सगळ्या सीझनमध्ये एलेक्स पारिश या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेमध्ये प्रियांका चोप्राच दिसणार.