सध्या प्रत्येक मोठ्या निर्मात्याला मराठीत एखाद्या तरी सिनेमाची निर्मिती करावी असे नेहमीच वाटते. त्यामुळेच हिंदी सिनेसृष्टीतले अनेक कलाकार निर्मिती क्षेत्रात उतरल्यानंतर मराठी सिनेमांच्या निर्मितीला अधिक प्राधान्य देतात. मग तो अक्षय कुमार असो किंवा प्रियांका चोप्रा. प्रियांकाने गेल्याच वर्षी ‘व्हेंटिलेटर’ या तिच्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. विनोदी, पण तितकेच अंतर्मुख करायला लावणाऱ्या ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमाची निर्मिती केल्यानंतर आता ती प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाली आहे. ‘काय रे रास्कला’ या सिनेमाद्वारे ती पुन्हा एकदा मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे.

नुकताच या सिनेमाचा मुर्हुत पार पडला. मुर्हुतावेळी प्रियांकाची आई डॉ. मधु चोप्रा, सिनेमाचे दिग्दर्शक गिरीधरन स्वामी तसेच गौरव घाटणेकर यांसारखे सिनेमातील कलाकारही यावेळी उपस्थित होते. त्याशिवाय सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणारी कुनिका सदानंदही यावेळी उपस्थित होती. ‘काय रे रास्कला’साठी कार्यकारी निर्मातीची भूमिका कुनिका सदानंद साकारत आहे.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित

आपली प्रत्येक कलाकृती ही तितकीच सक्षम असावी आणि आपल्या शुभेच्छा त्या प्रत्येक गोष्टीला मिळाव्या यासाठी प्रियंका नेहमीच आग्रही असल्याचं आपल्याला दिसतं. नुकत्याच पार पडलेल्या या मुहूर्तावेळी प्रियंका चोप्रा स्वत: उपस्थित राहू शकली नसली तरी व्हिडीयोद्वारे तिने ‘काय रे रास्कला’ च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. तर हा सिनेमाही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित ‘काय रे रास्कला’ सिनेमाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांनी केली असून संगीता स्वामी आणि डॉ. सत्यशील बिरदार या सिनेमाचे सह-निर्माते आहेत. या सिनेमाच्या चित्रिकरणास सुरूवात झाली असून नावातच दाक्षिणात्य तडका असलेला ‘काय रे रास्कला…’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.