पुण्यातील महाविद्यालयांमध्ये सध्या चर्चा आहे ती पुरुषोत्तम करंडक स्पध्रेची. ८ ते २८ ऑगस्टदरम्यान स्पध्रेची प्राथमिक फेरी भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. मात्र, मोठय़ा जल्लोषात या स्पध्रेत उतरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धा म्हणजे काय हे नीट समजून घेतलं पाहिजे.

महाविद्यालयीन सांस्कृतिक जीवनाचा केंद्रिबदू असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेची तयारी सुरू झाली आहे. विषयाची निवड, इम्प्रोवायझेशन, तालमी वेग घेऊ लागल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पुण्यातील महाविद्यालये ‘पुरुषोत्तम’चा अभ्यासक्रम काय हेच समजून घेत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. एकांकिकेत तंत्राची श्रीमंती नाही, तर आशयाची श्रीमंती दिसली पाहिजे. पुरुषोत्तम करंडक स्पध्रेत केवळ लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयालाच महत्त्व आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे.

sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन
pramod bhagat
जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धा: यथिराज, प्रमोद, कृष्णाचा अंतिम फेरीत प्रवेश
cricket tournament in Raigad
रायगडमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून मतांची बेगमी
case registered, extortion, businessman, offensive videos, mumbai
आक्षेपार्ह चित्रफीतीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी, ३५ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल

पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ही व्यावसायिक कलाकार घडवण्यासाठीची स्पर्धा नाही. विद्यार्थ्यांना नाटक हे माध्यम कळावं, त्यांच्यातल्या कलागुणांना मंच मिळावा या हेतूनं ही स्पर्धा सुरू झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत स्पध्रेचं स्वरूपच बदलून गेलं आहे. रोजच्या जगण्यावर असलेला तंत्राचा प्रभाव एकांकिकांमध्येही दिसून येऊ लागला आहे. उदाहरणार्थ, मॉन्टाज हा चित्रपटात वापरला जाणारा प्रकार एकांकिकांमध्ये सर्रास वापरला जातो. ४५ मिनिटांच्या एकांकिकेत १० ते १५ वेळा ब्लॅकआऊट होऊ लागले आहेत. भरपूर दिवे, भरगच्च नेपथ्य केलं जाऊ लागलं आहे. अर्थात, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यांचा विचार महत्त्वाचा असला, तरी त्याचं स्थान दुय्यम आहे. व्यावसायिक नाटकांतला चकचकीतपणा या स्पध्रेत अपेक्षितच नाही. कारण, पुरुषोत्तम करंडक ही प्रायोगिकतेची स्पर्धा आहे. एखादा विषय संयतपणे, उत्तम अभिनय, लेखन, दिग्दर्शनातून किती प्रभावी आणि वेगळ्या पद्धतीने मांडला जातो, याला महत्त्व आहे. विषय प्रभावी करण्यासाठी नाटय़पूरक तंत्रांचा वापर करण्यास हरकत नाही. मात्र, तंत्राच्या चौकटीत एकांकिका करण्यात काहीच अर्थ नाही. गेली काही र्वष सातत्याने तंत्राचा वापर वाढत असल्यानं एकांकिकांतलं नाटय़च संपत चाललं आहे. नाटय़रूपांतर करतानाही काळजी घेतली पाहिजे. मूळ कथानक आणि नाटक हे माध्यम यांचाही अभ्यास करून मग नाटय़रूपांतर करायला हवे.

स्पध्रेचे आयोजक ‘महाराष्ट्रीय कलोपासक’चे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनीही पुण्याच्या एकांकिकांविषयी असमाधान व्यक्त केले. ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धा म्हणजे काय हे विद्यार्थी समजूनच घेत नाहीत. या स्पध्रेत तंत्राला अजिबात महत्त्व नाही. नेपथ्य, प्रकाशयोजना या साऱ्या नाटय़पूरक गोष्टी आहेत. त्याचा किती वापर करायचा याला काही मर्यादा आहेत. तंत्राच्या अतिरेकानं पुण्यातील एकांकिका एकसुरी होऊ लागल्या आहेत. त्यातलं नावीन्य संपून जात आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिल्या २० वर्षांत ज्या प्रकारच्या एकांकिका सादर झाल्या, तशा एकांकिका आता पुण्याबाहेरच्या केंद्रांवर होत आहेत. त्यामुळेच स्पध्रेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी महाअंतिम फेरीतील जवळपास सर्वच पारितोषिके पुण्याबाहेरील संघांनी पटकावली होती. यावरूनच पुण्यातील एकांकिकांच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण होतो. या पाश्र्वभूमीवर, यंदा विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर करण्यापूर्वी आपला विषय आणि सादरीकरणाचा पुनर्वचिार करण्याची वेळ आली आहे. महाविद्यालयीन पातळीवरच्या एकांकिकांमध्ये असणारं कच्चेपण इथं अपेक्षितच आहे,’ असं ठाकूरदेसाई यांनी सांगितलं.

chinmay.reporter@gmail.com