‘क्वांटिको’ सीरिज आणि ‘बेवॉच’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या बऱ्याच दिवसांपासून अमेरिकेत राहात होती. पण, आता मात्र ही ‘देसी गर्ल’ भारतात परतली असून सध्या ती पार्टी आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. अभिनेत्री म्हणून यशस्वी ठरलेल्या प्रियांकाने ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. प्रियांकाची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. हाच आनंद साजरा करण्यासाठी प्रियांकाने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी ‘व्हेंटिलेटर’ची संपूर्ण टीम या पार्टीत हजर होती.

प्रियांकाने या पार्टीतील एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून, यात तिने संपूर्ण ‘व्हेंटिलेटर’च्या टीमचे आभार मानले आहेत. प्रियांकाने लिहिलेले हे कॅप्शन वाचताना तिच्या टीमसोबत असलेलं तिचं मित्रत्त्वाचं नातं स्पष्ट होत आहे.

‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटामध्ये कलाकारांची मांदियाळी होती. याच चित्रपटातील काही कलाकारांनी ‘देसी गर्ल’च्या पार्टीला हजेरी लावत सेलिब्रेशन केलं. ‘पीसी’च्या पार्टीला ‘व्हेंटिलेटर’चे दिग्दर्शक राजेश मापुस्कर, आशुतोष गोवारिकर, उषा नाडकर्णी, श्रृती मराठे आणि इतर कलाकारांनी हजेरी लावली.

https://www.instagram.com/p/BTUgSEiA3hR/

हे आहेत प्रियांका चोप्राच्या या पार्टीमध्ये हजेरी लावलेले काही सेलिब्रिटी..

unnamed-44

unnamed-212

unnamed-119

unnamed-118

unnamed-93

unnamed-74

unnamed-53

दरम्यान, भारतात परतूनही प्रियांकाला तिच्या कामांतून काही केल्या उसंत मिळत नाहीये. ती पूर्णपणे वर्कोहोलिक आहे, असं प्रियांकाच्या आईनेही हे मान्य केलंय. त्यामुळेच एकीकडे हॉलिवूडचे बिग बजेट प्रोजेक्ट करत असतानाही तिने हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली नाही. देसी गर्ल प्रियांका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली असून, सध्या ती चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्याचे म्हटले जात आहे.