भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीताला नवीन परिभाषा दिली. आपल्या काळाच्या पुढे असणारे पंचमदांचा २७ जून हा जन्मदिवस. आज त्यांची ७१ वी जयंती. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांची संगीत रसिकांना चांगलीच जाण आहे. जाणून घ्या पंचमदांविषयीच्या अन्य गोष्टी…

१. पंचमदा नावाने प्रसिध्द असणऱ्या आर. डी. बर्मन यांना चित्रपटसृष्टीतदेखील याच नावाने बोलावले जात असे. तसेच ते तुबलु नावानेदेखील परिचित होते. त्यांना हे नाव त्यांच्या आजीने दिले होते. पंचम हे नाव त्यांना अशोक कुमार उर्फ दादामुनींकडून मिळाले होते. बाल्यावस्थेतील आरडींसारखा ‘पा’ असा उच्चार करीत, हे पाहून दादामुनींनी त्यांचे नाव पंचम असे ठेवले. पुढे ते यांच नावाने प्रसिध्द झाले.

बर्मन यांच्या रोमारोमात संगीत होते.

२. वयाच्या नवव्या वर्षी पंचमदांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले, ज्याचा वापर १९५६ च्या ‘फंटूश’ चित्रपटात करण्यात आला.

03-pancham-620x400लहानपणी असे दिसायचे पंचमदा.

३. पंचमदांचे वडील एस. डी. बर्मन हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते. एस. डी. बर्मन यांच्या ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ , ‘सिर जो तेरा चकराए’, ‘कोरा कागज था ये मन मेरा’ या गाण्यांमध्ये पंचमदांचादेखील सहभाग होता.

04-pancham-620x400पंचमदांना वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला होता.

४. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल आर. डी. बर्मन यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये वाद्य वाजवत असत. कुमार शानू, अभिजीत, मोहम्मद अजीज, शबीर कुमारसारख्या अनेक नवोदित गायकांना पंचमदांनी पहिल्यांदा गायनाची संधी दिली.

05-pancham-620x400आशा भोसले आणि पंचमदा

५. संगीतात नवीन प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. ‘चुरा लिया’ गाण्यासाठी ग्लासवर चमच्याने हळूवार प्रहार करून त्यांनी आवाज ध्वनिमुद्रित केला होता. एकदा पावसाचा आवाज ध्वनीमुद्रित करण्यासाठी त्यांनी अख्खी रात्र पावसात घालवली होती.

06-pancham-620x400एक दुर्मिळ छायाचित्र

६. पंचमदांच्या लग्नाचा किस्सा अगदी बॉलिवूडपटासारखा आहे. आपली चाहती रिटा पटेल हिच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघे दार्जिलिंगमध्ये भेटले होते. बर्मन यांच्याबरोबर मुव्ही डेटला जाण्याची पैज रिटाने आपल्या मैत्रिणींबरोबर लावली होती. तिनी ते करून दाखवले, मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी १९६६ मध्ये लग्न केले. परंतु, हे लग्न फारकाळ टिकले नाही. १९७१ मध्ये दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. याच काळात ‘मुसाफिर हूं यारों’ हे गाणे पंचमदांनी एका हॉटेलच्या खोलीत बसून लिहिले होते. नंतर १९८० मध्ये त्यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंशी लग्न केले.

07-pancham-620x400पूर्वाश्रमीची बायको रिटा पटेल आणि पंचमदा