सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘राबता’ या चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ‘एजंट विनोद’ या चित्रपटातील ‘राबता’ या गाण्याचं हे रिक्रिएटेड व्हर्जन आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे सुशांत-क्रितीच्या या प्रवासात पडद्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘राबता’ पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या निमित्ताने दीपिका ‘राबता’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं आता सर्वांसमोर उघड झालं आहे.

प्रीतमने संगीतबद्ध केलेलं हे गाणं इर्शाद कामिल आणि अमिताभ भट्टाचार्यने लिहिलं आहे. या गाण्याची चाल आणि शब्दरचना पाहता त्याला साथ देण्यासाठी पडद्यावरील दीपिकाचा वावर मात्र काहीसा खटकतो आहे. आपल्या अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करणारी ही ‘मस्तानी’ यावेळी मात्र सपशेल अपयशी ठरली आहे. ‘राबता’साठी दीपिकाची अदा आणि एकंदर समोरच्याला भुलवण्यासाठी तिने केलेला अभिनयही खटकतोय. त्यामुळे हा कॅमिओ दीपिकाच्या चाहत्यांना काही भावला नाहीये असं म्हणायला हरकत नाही.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

दरम्यान, दिनेश विजन दिग्दर्शित ‘राबता’ या चित्रपटामुळे बी- टाऊनच्या बहुचर्चित कपल म्हणजेच सुशांत सिंग राजपूत आणि क्रितीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. होमी अदजानियाची निर्मिती असणारा ‘राबता’ ९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : क्रितीसोबतच्या ‘लाँग ड्राईव्ह’ विषयी सुशांत म्हणतो..

https://www.instagram.com/p/BTYFAkUDh2h/