अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामामध्ये फारच व्यग्र आहे. विविध धाटणीच्या भूमिकांना प्राधान्य देणाऱ्या या किंग थखानचा आगीम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या मार्गावर आहे. पण, त्याआधीस शाहरुख त्याच्या चाहत्यामध्ये या चित्रपटासाठीची उत्सुकता वाढवण्यावर जास्त भर देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला ज्यामध्ये ७ डिसेंबरला चाहत्यांना किंग खान काहीतरी सरप्राइज देण्याच्या तयारीत सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचेच लक्ष या तारखेकडे लागून राहिले आहे. शाहरुखच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर लगेचच बघता बघता सोशल मीडियावर #RaeesTrailer ट्रेंडमध्ये आला.

ट्विटर आणि सोशल मीडियावर सर्वत्रच ‘रईस’ या चित्रपटाचीच चर्चा सुरु असताना सरतेशेवटी या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या दिमाखात प्रेक्षकांच्या भेटीला आला. देशातील जवळपास ३५०० चित्रपटगृहांमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसोबत थेट संवाद साधत शाहरुख खानने हा ट्रेलर प्रदर्शित केला. ‘अम्मीजान कहती थी कोई धंदा छोटा नही होता…और धंदे से बडा कोई धर्म नही होता’ या वजनदार वाक्याने या ट्रेलरची सुरुवात होत आहे. ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे कुतुहल आणखीनच वाढते. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली थरारक दृश्ये, शाहरुखचा हटके, गॅंगस्टर लूक आणि त्याते डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेले पार्श्वसंगीत आणि कलाकारांचे संवाद पाहता या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असणार. ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीच्या अभिनयाची झलकही पाहायला मिळत आहे. पण, त्यासोबतच मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीही या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. त्यामुळे किंग खानचा ‘रईस’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होणार असंच दिसतंय.

Vijay Kondke movie Lek Asavi Tar Ashi trailer released
‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जबरदस्त ट्रेलर
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

चित्रपटाच्या ट्रेलरआधी ट्विटरद्वारे एका वेगळ्या आणि शांत पण तितक्याच आक्रमक लूकमधील हा ‘रईस’ अभिनेता या पोस्टरद्वारे पाहायला मिळत होता. या पोस्टरमधील शाहरुखच्या लूकला आणखीनच उठावदार करत आहे ते म्हणजे त्याच्या गळ्यातील लॉकेट. या लॉकेटबद्दल ट्विट करत शाहरुखने लिहिले होते की, ‘हे माझे स्वत:चे लॉकेट आहे. ज्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा फोटो आहे’. त्यामुळे या चित्रपटामध्ये आई-वडिलांचा आशिर्वादही किंग खानच्या पाठिशी आहे असेच म्हणावे लागेल. २६ जानेवारीला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण, आता मात्र हा चित्रपट एक दिवस आधी म्हणजेच २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, ‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिका उठावदार करण्यासाठी शाहरुख खानने लतीफच्या मुलाचीही भेट घेतली होती. लतिफचा मुलगा मुश्ताक अहमदने शाहरुखला सहकार्य देखील केले. या चित्रपटाच्या चर्चेला नव्याने तोंड फुटले ज्यावेळी लतिफच्या मुलाने शाहरुखकडे १० कोटीची मागणी केल्याची माहिती मिळाली. मुश्ताकने पैशांची मागणी केल्यानंतर शाहरुखने त्याला भेटण्यास टाळाटाळ केली. इंग्रजी वृत्तपत्र ‘डिएनए’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मुश्ताकने शहारुखकडे १० कोटीची मागणी केली आहे. तसेच सध्या शाहरुखच्या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी मुश्ताक तयारी करत असल्याची देखील चर्चा आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.

raees-1

raees-trailer-1

raees-trailer-2