बॉलिवूड अभिनेत्री झिनत अमान यांनी खुलासा करत सांगितले की, बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांनी झिनत यांना सोन्याची नाणी दिली होती. येऊ घातलेल्या माय लाइफ माय स्टोरी या एका टीव्ही कार्यक्रमात त्यांनी आपल्या आयुष्यातील काही आठवणीतले प्रसंग सांगितले. १९७८ मध्ये एका लूक टेस्टमध्ये त्यांना कसा एक हिट सिनेमा मिळाला आणि राज कपूर कसे आश्चर्यचकित झाले हा किस्सा त्यांनी या कार्यक्रमात सांगितला.
आठवणींना उजाळा देताना त्यांनी सहकलाकार, अनूभव, सिनेसृष्टीतला त्यांचा प्रवास यांबद्दल मनमोकळ्या चर्चा केल्या. माय लाइफ माय स्टोरी या कार्यक्रमात हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कलाकारांना बोलावले जाते.

झिनतने सांगितले की, एक दिवस मला सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात रुपी ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. रुपा या व्यक्तिरेखेच्या टेस्ट दरम्यान, राज कपूर हे रुपा या व्यक्तिरेखेमध्ये मला बघून आश्चर्यचकित झाले. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले. त्यावेळी त्यांनी मला सोन्याची नाणी दिली आणि त्या सिनेमासाठी मला साइनही केले.

दरम्यान, हिंदी सिनेसृष्टीचा अस्सल ‘शोमॅन’ म्हणून कायम राज कपूर यांचेचे नाव घेतले जाते. पण मग शोमॅनशीपमधे राज कपूरचा वारस कोण हा प्रश्न देखिल स्वाभाविकपणे पडतो. ऐंशीच्या दशकापासून सुभाष घईचे शोमॅन म्हणून नाव घेतले जाऊ लागले. शोमॅन म्हणजे मसालेदार मनोरंजनाची हमी. यांची प्रत्येक गोष्ट जणू बातमीत राहते. गीत-संगीत-नृत्य यांचे दिमाखात रुपेरी सादरीकरण आणि प्रसार माध्यमं व प्रेक्षकांकडून अनेकदा तरी कौतुकाचा वर्षाव! यांचा सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीचे मंतरलेले दिलखुलास वातावरण.

‘कर्मा’ (१९८६) च्या वेळेस तसेच होते. सुभाष घईचा हा चित्रपट मुहूर्तापासूनच चर्चेत होता. दिलीपकुमार, नूतन, नसीरुद्दीन शाह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी पूनम धिल्लॉन, अनुपम खेर असा जबरदस्त कलाकार संच व लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत. एकूणच भव्यता स्पष्ट करणारे असेच सिनेमाचे आगमन. अशाच वातावरणात राज कपूरच्या हस्ते ‘कर्मा’च्या गीत-संगीत ध्वनिफितीचे प्रकाशन अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील या सोहळ्यात राज कपूर व सुभाष घई यापैकी जास्त प्रभावित कोणी ठरले याचे उत्तर अनेक दिवस सापडले नाही व नंतर ते उत्तर मिळवणेही मागे पडले. सिनेसृष्टीतील असे सोहळे आनंदाने अनुभवायचे असतात. कारण दोन पिढ्यांचे शोमॅन एकत्र येण्याचे असे चंदेरी योग तसे कमीच. पण जेव्हा येतात तेव्हा ते कायमच आठवणीत राहतात ते हे असे. दिलीप कुमारच्या चित्रपटाच्या गाण्याच्या ध्वनिफितीचे राज कपूरच्या हस्ते प्रकाशन आणि हे दोघेही एकाच सोहळ्यात हा योग देखिल विशेषच…