‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ६४ वा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले दिग्दर्शक राजेश मापुसकर आता लवकरच भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळकेंना श्रद्धांजली अर्पण करीत ५५ सेकंदांचा लघुपट दिग्दर्शित करणार आहेत.

भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडिराव गोविंद फाळके म्हणजेचं दादासाहेब फाळके, एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व. चलचित्रांच्या माध्यमातून सगळ्यांनाच अवाक करणारा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ निर्माण करून फाळकेंनी भारतीय सिनेमांची बीजं रुजवली. ज्यामुळे आज एक मोठी सिनेसृष्टी उभी राहिली आणि म्हणूनच आज फक्त भारतचं नाही तर सारं जग दादासाहेबांना सलाम करत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळकेंचं योगदान त्यांचं कर्तृत्व हे जगविख्यात असलं तरीही नव्या पिढीतल्या अनेकांना दादासाहेब फाळके कोण होते? याची माहिती नाही, म्हणून महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पहिला भारतीय चित्रपट कसा बनविला गेला आणि दादासाहेब फाळकेंच्या कर्तृत्वाबद्दल नव्या पिढीत जागरूकता निर्माण करण्यासाठी दिग्दर्शक राजेश मापुसकरांशी संपर्क साधून दादासाहेब फाळकेंवर आधारित ५५ सेकंदांचा व्हिडीओ तयार करण्यास सहमती दिली आहे. प्रत्येक सिनेमाच्या सुरुवातीला सिनेमागृहात राष्ट्रगीतानंतर हा लघुपट दाखवला जाणार आहे.

balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

वाचा : चित्रपटगृहात बुरखा घालून जाणारी ‘ती’ मराठी अभिनेत्री कोण आहे माहितीये?

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंवर आधारित या लघुपटाची संकल्पना आणि लेखन राजेश मापुसकर यांनी स्वत: केले असून या लघुपटाच्या दिग्दर्शनाच्या संधीविषयी बोलताना राजेश मापुसकर म्हणाले, ‘जेव्हा पहिल्यांदा विनोद तावडेजींनी मला या लघुपटाच्या दिग्दर्शनाबाबत विचारलं तेव्हा मला खूप आनंद झाला. एका क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना लगेच माझा होकार कळवला. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित हा लघुपट बनवायची संधी मला दिल्याबद्दल मी विनोदजींचा खूप खूप आभारी आहे.’ लवकरच याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून मी त्यासाठी खूपचं उत्सुक असल्याचं ही ते म्हणाले.

वाचा : ‘करण पैसे कमवतो, पण वर्षभर आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो’