‘मोहोंजोदारो’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करु न शकल्याने सध्या हृतिक फार उदास झाला आहे. आशुतोष गोवारीकर आणि हृतिक अपयशासाठी एकमेकांना अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरवत आहेत. ऋतिक एकटा ५० सीटरच्या ऑडी गाडीत बसून डिझ्नीच्या ऑफिसमध्ये सिनेमा पाहायला गेलेला. तर दुसरीकडे अक्षय कुमारने सिनेइण्डस्ट्रीसाठी ‘रुस्तम’ सिनेमाचे स्क्रिनिंग ठेवले होते. हृतिक त्याच्या वडिलांना राकेश रोशन यांना प्रदर्शनाच्या आधी सिनेमा दाखवतो. पण मोहोंजोदारोच्या बाबतीत असे झाले नाही. पण राकेश रोशन यांनी प्रदर्शनापूर्वी सिनेमा पाहिलाच नाही. सध्या सिनेवर्तुळात चर्चा सुरु आहे ती म्हणजे हृतिकला सिनेमाचं हे अपयश फार मनाला लागलं आहे. पण तो ते दाखवत नाहीए.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परत एकदा हृतिक वडिलांच्या बॅनरखाली बनणाऱ्या सुपरहिरो सिनेमावर विसंबून आहे. सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरु होईल. पुढच्या वर्षीच्या अखेरीस ‘क्रिश’ सिरीजचा पुढच्या भागाचे चित्रिकरण सुरु करणार असल्याचे हृतिकने सांगितले. सध्या बाबा एका संहितेवर काम करत आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या अखेरीस आम्ही चित्रिकरणाला सुरुवात करु असे त्याने सांगितले.
मी माझ्या आतापर्यंतच्या सिनेमासाठी भरपूर वेळ घेतला आहे. मला फॅन्सकडून अधिक सिनेमे करण्याची पत्रेही आली आहेत. मी माझ्या कामाच्या स्वरुपात बदल केला आहे. आता मी अधिक सिनेमे करण्याकडे लक्ष देत आहे. ‘काबिल’ या आगामी सिनेमाच्या शुटिंगनंतर मी लगेच दुसऱ्या सिनेमाचे शुटिंग सुरु करणार आहे. फॅन्ससाठी मी वर्षात दोन ते तीन सिनेमे करण्याचा प्रयत्न करणार आहे असेही तो म्हणाला.
सुत्रांच्या माहितीनुसार, ‘काबिल’ सिनेमाच्या चित्रिकरणाच्यावेळी हृतिक सेटवर अनेकदा चिडचिड करताना दिसला. सेटवर तो काही दिवस गेलाही नाही. सेटवर काही दिवस न आल्यामुळे त्याला फोन केला तर त्याने फोनही उचलले नाहीत. त्याच्या अशा वागण्यामुळे ‘काबिल’ सिनेमाला दिवसाला १२ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्याला ताप येत होता आमि ‘मोहोंजोदारो’च्या अपयशामुळे त्याची चिडचिडही होत होती. यामुळे हृतिकने काही वेळ स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याचे ठरवले होते. पण ‘काबिल’चे निर्माते राकेश रोशन यांनी मात्र या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. हृतिकला ताप आल्यामुळे त्याने विश्रांती घेतली होती, पण लगेच तो ‘काबिल’च्या शुटिंगला उपस्थित राहिला असेही ते म्हणाले.