‘बाहुबली’ या सिनेमात राजमाता शिवगामी देवीची व्यक्तिरेखा अभिनेत्री रम्या कृष्णनने साकारली आहे. राजमातेचे निडर व्यक्तिमत्व, तिचा दरारा, रुबाब अनेकांनाच आवडला. माहिष्मती साम्राजाच्या या राजमातेचा बॉलिवूडशी फार जवळचा संबंध राहिला आहे.

रम्याने आतापर्यंत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक सिनेमांत काम केले आहे. पण बॉलिवूडमधील तिच्या करिअरची सुरूवात १९८८ मध्ये आलेल्या फिरोज खान यांच्या दयावान या सिनेमाने झाली. या सिनेमात तिने एक डान्सर म्हणून कॅमिओ केला होता. १९९३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या खलनायक सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. पण हिंदी सिनेसृष्टीत तिला ‘चाहत’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमांसाठी विशेष करून ओळखले जाते. महेश भट्ट दिग्दर्शित ‘चाहत’ सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये शाहरुख खान आणि पूजा भट्ट होते.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

‘चाहत’ सिनेमात रम्याची व्यक्तिरेखाही शाहरुखच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अशा एका मुलीची होती. शाहरुखला मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी असते. या सिनेमात नसिरुद्दीन शाह यानी रम्याच्या भावाची भूमिका साकारली होती. डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमात ती अमिताभ बच्चन यांच्या हिरोईनच्या भूमिकेत दिसली होती. ‘बडे मिया…’ हा पहिला सिनेमा आहे, ज्यात अमिताभ आणि गोविंदा यांनी एकत्र काम केले होते. या सिनेमात दोघांचीही दुहेरी भूमिका होती.

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ हा सिनेमा आज संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. जगभरात अंदाजे ९००० चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज, रम्या कृष्णन, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतील कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.