कपूर कुटुंब नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही संपूर्ण कपूर कुटुंबिय एकत्र दिसत होते. वाढदिवसानंतर परत एकदा बेबो आणि लोलोनी म्हणजे करिना कपूर आणि करिश्मा कपूर पुन्हा एकदा एकत्र पार्टी करताना दिसल्या. पण ही पार्टी कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टवर नव्हती तर घरीच साजरी करण्यात आली होती. या पार्टीत जेवण बनवण्याची जवाबदारी रणबीर कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर होती. हो तुम्ही बरोबर वाचताय.. या दोघांनी मिळून त्या दिवशी खास जेवण बनवले होते.

त्याचे झाले असे की रणबीर कपूर, सैफ अली खान, करिना आणि करिश्मा हे सगळे काका शशी कपूर यांच्या घरी गेले होते. या पार्टीत करिश्मा तिचा कथित प्रियकर संदीप तोषनीवाल याच्यासोबत आली होती. रणधीर कपूरच्या पार्टीमध्येही संदीप तोषनीवाल याची उपस्थिती होती.
सैफ अली खानची मुलगी सारा अली खानही या पार्टीमध्ये उपस्थित होती. करिश्मा सध्या इन्स्टाग्रामवर फार सक्रीय असेत. तिनेच या कौटुंबिक सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमुळेच पार्टीच्या खानपानाची जवाबदारी रणबीर आणि सैफने घेतलेली हा खुलासाही झाला.

सैफ जेवण बनवण्याशिवाय करिनाला तैमुरच्या संगोपनामध्येही मदत करतो. जेव्हा तैमुर अली खान पतौडीचा जन्म झाला तेव्हा सैफने खास पॅटर्निटी सुट्टी घेतली होती.