बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने यावर्षी हॅटट्रिक मारली आहे.  आधी ‘एयरलिफ्ट’, नंतर ‘हाउसफुल ३’ आणि आता ‘रुस्तम’ हे हिट चित्रपट दिल्यानंतर पार्टी तर झालीचं पाहिजे. आपल्या यशानिमित्त अक्षयने रविवारी दिलेल्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा, करण जोहर पासून अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर आणि अन्य काही कलाकार उपस्थित होते. या पार्टीला अभिनेता रणबीर कपूरही उपस्थित होता. या सर्व कलाकार मंडळींनी मिळून खूप मस्ती-मजा केली. पण या पार्टीतील एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने सदर फोटो ट्विट केलायं. जॅकलीनने शेअर केलेल्या या फोटोत सर्व सेलिब्रेटी मंडळी कॅमे-यास पोज देताना दिसतात. पण रणबीर कपूर कॅमे-यास पोज न देता कोणाला तरी किस करताना दिसतोय. रणबीर किस करत असलेला अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून ढिशूम चित्रपट अभिनेता वरुण धवन आहे. या फोटोत अक्षय कुमार, ढिशूम चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित, अर्जुन, श्रद्धा कपूर, जॅकलीन, ट्विंकल खन्ना, करण आणि सोनाक्षी सिन्हा हे दिसत आहेत.

Class of 2016 ❤️😘😍💋

A photo posted by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on


केवळ या फोटोमुळे नाही तर ही पार्टी चर्चेत राहण्याचे आणखी एक कारण आहे. अक्षय कुमारच्या या पार्टीला हॉलीवूड स्टार विल स्मिथ हा प्रमुख अतिथी होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने तो एक उत्तम यजमान असल्याचे या पार्टीद्वारे दाखवून दिले. पार्टीला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची अक्षय स्वतः आपुलकीने विचारपूस करत होता.

OMG #freshprinceofbelair

A photo posted by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on


अक्षय कुमारच्या रुस्तम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटासोबत हृतिकचा मोहेंजोदारो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण रुस्तम चित्रपटाने मोहेंजोदारोला मागे टाकत १०० कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे.