‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांची नावं घेतल्यावर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचीच नावं समोर येतात. या जोडीच्या अफलातून ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे बऱ्याच चर्चा रंगल्या. या चर्चा रंगण्याचं कारण फक्त त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच होती असं नाही तर ऑफस्क्रीनही या दोघांमध्ये बरीच जवळीक पाहायला मिळाली होती. अगदी काल- परवापर्यंत त्यांच्या नात्यात सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानकच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.

महिन्यात फक्त १५ दिवस काम करतात शिवाजी साटम, पण त्यांचे मानधन वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

बॉलिवूडचे हॉट कपल म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं अशा रणवीर आणि दीपिका यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सिनेवर्तुळात फिरत होत्या. पण दीपिकाच बेस्ट किसर असल्याचे सांगून रणवीरने या अफवांना पुर्णविराम दिले आहे. नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा सिझन २’ मध्ये रणवीर सिंग गेला होता. त्यावेळीच त्याने हा खुलासा केला. रणवीरचा एक ऑडिओ ट्विटरवर खूप शेअर केला जात आहे. १० सेकंदाच्या या ऑडिओमध्ये दीपिका ‘बेस्ट किसर’ असल्याचे तो म्हणतो. नेहाच्या कार्यक्रमाचा हा भाग काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला आहे.

रणवीर आणि दीपिकाने आतापर्यंत संजय लीला भन्साळी यांच्या राम-लीला आणि बाजीराव- मस्तानी या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. तसेच ते दोघंही भन्साळी यांच्या पद्मावती या आगामी सिनेमाचे चित्रीकरणही करत आहेत. पद्मावतीमध्ये रणवीर अलाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रणवीरला या नात्याला पुढे नेत लग्न करायचं होतं. पण, कामाच्या वाढत्या व्यापामुळे दीपिका लग्नासाठी तयार नव्हती.