रणबीर कपूरमुळे रणवीर सिंग स्टार बनला, असे म्हटल्यास ते अजिबात चुकीचे ठरणार नाही. रणबीरने ना रणवीरची कधी शिफारस केली, ना रणवीरसाठी एखादा मोठा त्याग केला. रणबीरने फक्त एक चित्रपट नाकारला आणि रणवीरला त्याच चित्रपटात संधी मिळाली. बँड बाजा बारात हा चित्रपट रणबीरने नाकारला होता. त्यामुळे या चित्रपटासाठी रणवीरला विचारणा करण्यात आली. रणबीरने बँड बाजा बारात नाकारणे हे रणवीरच्या चांगलेच पथ्यावर पडले.

‘बँड बाजा बारात’ची कथा न आवडल्याने रणबीर कपूरने हा चित्रपट नाकारला. यानंतर याच चित्रपटात रणवीरने मुख्य भूमिका साकारली. बँड बाजा बारात चित्रपट यशस्वी ठरला आणि रणवीर सिंग स्टार झाला. रणवीर सोबत असलेल्या या कनेक्शनबद्दलची ही गोष्ट रणबीर कपूरने एका कार्यक्रमात सांगितली. यावेळी आपण एक चांगला चित्रपट गमावल्याची खंत रणबीर कपूरने व्यक्त केली. ‘बँड बाजा बारात’च्या यशानंतर उत्कृष्ट अभिनय आणि उत्तम चित्रपटांची निवड करत रणवीर सिंगने आपली घौडदौड कायम राखली.
‘बँड बाजा बारात’च्या यशानंतर रणवीरने मागे वळून पाहिले नाही. आज बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांना रणवीरसोबत काम करण्याची इच्छा आहे. आदित्य चोप्राने दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करतानाही रणवीर सिंगची निवड केली. आदित्य चोप्रा रणवीरसोबत बेफ्रिके चित्रपट करणार आहे.
बेफ्रिकेसोबतच रणवीर संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटातदेखील दिसणार आहे. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या भूमिका असणार आहेत. पद्मावती हा एका विशिष्ट कालखंडातील चित्रपट असणार आहे. सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी आणि राणी पद्मावती यांच्या प्रेमाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात रणवीर अल्लाउद्दीन खिल्जी तर दीपिका पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहेत. रणवीर आणि दीपिका यांनी याआधी बाजीराव मस्तानी चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे आणि केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले होते.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!