२०१० साली मराठी चित्रपटसृष्टीत एका दमदार चित्रपटाने अगदी दणक्यात सिनेरसिकांच्या मनावर वेगळीच जादू केली होती. महाराष्ट्रातील तमाशाप्रधान संस्कृतीवर एका वेगळ्याच शैलीत भाष्य करत रवी जाधवने ‘नटरंग’ हा चित्रपट सिनेरसिकांसमोर सादर केला होता. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटात मराठीतला मिस्टर परफेक्शनीस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अतुल कुळकर्णी, अभिनेत्री सोनाली कुळकर्णी, किशोर कदम, प्रिया बेर्डे या कलाकारंच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला त्याच्या मजबूत कथानकासोबतच अजय-अतुल यांच्या जोडीने दिलेल्या संगीतामुळेही बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
एका वेगळ्या पटकथेसह प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये सर्वच कलाकारांनी त्यांच्या भूमिकांसाठी घेतलेली मेहेनत, चित्रपट साकारताना त्यातील लहानमोठ्या सर्वच कलाकारांनी चित्रपटासाठी उत्फूर्त योगदान दिले होते. ‘नटरंग’ साकारताना घडलेल्या अशाच अनेक आठवणींना उजाळा देण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन ‘मेकिंग ऑफ नटरंग’ हा व्हिडिओ शेअर केला आहे. स्पेशल चित्रपट असा उल्लेख करत रवी जाधव यांनी ‘पहीला सिनेमा, पहीला टेक, पहीला अनुभव!!!..’ असे म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे. मराठी सिनेरसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या या चित्रपटाची ही ‘मेकिंग’ची सफरसुद्धा प्रेक्षकांमध्ये सध्या बरीच गाजत आहे.

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”