टेलिव्हिजन जगतातील रियल लाइफ कपल बरखा बिष्ट सेनगुप्ता आणि इंद्रनील सेनगुप्ता हे एक सुंदर जोडपे आहे. त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर जर एक नजर टाकली तर हे दोघेही एकमेकांवर किती प्रेम करतात ते दिसून येते. काही दिवसांपूर्वीच बरखाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत हे दोघेही मॅरेथॉन दरम्यान एकमेकांना किस करताना दिसतात. आयडीबीआय बँकेतर्फे हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्यात या जोडप्याने सहभाग घेतला होता. बरखाने आपल्या पतीसोबतचा हा फोटो पोस्ट करत म्हटले की, माझी पहिली हाफ मॅरेथॉन. मी रात्री उशिरापर्यंत चित्रीकरण करत होते. केवळ ४५ मिनिटे मला झोपता आले. तरीही मी ही मॅरेथॉन पूर्ण केली. हे मी केवळ तुझ्यासाठीच केले आहे. या पोस्टमध्ये तिने इंद्रनीललाही टॅग केले आहे.
कामात व्यस्त असलेल्या बरखाने वेळ काढून या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनवरूनच या दोघांमध्ये असलेल्या प्रेमाची प्रचीती येते. दोन वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बरखा आणि इंद्रनीलने २००८ साली विवाह केला होता. त्यांना पाच वर्षांची गोंडस मुलगीदेखील आहे. ख-या आयुष्यातील या जोडप्याने टेलिव्हिजनवरही ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. ‘प्यार के दो नाम: एक राधा, एक श्याम’ आणि ‘डोली सजा के’ या दोन मालिकांमध्ये हे दोघे एकत्र झळकले होते. याव्यतिरीक्त बरखाने राम लीला चित्रपटातही काम केले होते. तसेच सोनी वाहिनीवरील कॉमेडी सर्कस के अजूबे या शोचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर आता ती लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील नाम करण या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत विराफ पटेल हा अभिनेता दिसेल. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या अॅण्ड जरा हटके या चित्रपटाद्वारे इंद्रनीलने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.