अनिल डी. अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेनमेंटचा पहिलावहिला मूव्ही प्लॅटफॉर्म बिगफ्लिक्स आता जगभरातील प्रेक्षकांसाठी ब्लॉकबस्टर ठरला आहे. रिलायन्स एन्टरटेनमेंटने आज नऊ भाषेतील बिगफ्लिक्सची घोषणा करून जागतिक बाजारपेठेत बहु-भाषिक अप्लीकेशन उपलब्ध करून दिले आहे. या अप्लीकेशनला भारतासह परदेशातही मोठा प्रतिसाद लाभत आहे.

या नवीन बिगफ्लिक्समध्ये २००० एचडी सिनेमे नऊ भाषांमध्ये दाखविण्यात येतील, ज्यामध्ये हिंदी, तेलुगू, तमिळ, पंजाबी, मल्याळम, गुजराती, मराठी, भोजपुरी आणि बंगाली भाषा समाविष्ट असतील. बिगफ्लिक्सचे तंत्रज्ञान भारतीय असून ते सिनेमा- जाहिराती मोफत स्ट्रीम आणि डाऊनलोड प्रत्येक व्यक्तीला अप्लीकेशनद्वारे करता येईल. हे स्ट्रीम आणि डाऊनलोड कोणत्याही इंटरनेट जोडणी असलेल्या उपकरणावर म्हणजे स्वत:चा कॉम्प्यूटर, टॅबलेट, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि गेम कन्सोलवर करता येईल.

बिगफ्लिक्स टेक्नोलॉजी युजर्सना मल्टी-स्क्रीन बघण्याचा अनुभव घेता येईल. स्वतःच्या टॅबलेट, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर सिनेमा पाहणे शक्य होईल, शिवाय सिनेमाच्यामध्येच बॅक / मागेही जाता येईल. या तंत्रज्ञानामुळे सर्वांनाच सिनेमाचा आनंद घेणे सहज शक्य असेल.
रिलायन्स एन्टरटेनमेंटचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री शिबाशिष सरकार म्हणाले की, “भारतीय डिजीटल एन्टरटेनमेंट चा मोठ्या प्रमाणावर सध्या वापर करत आहेत. होम व्हीडियो मार्केटचा घसरत जाणारा टक्का बिगफ्लिक्समुळे कमी होईल आणि डिजीटल सिनेमाचा आनंदही घेता येईल.” ३.९ दशलक्ष नोंदणीसोबत बिगफ्लिक्स एसव्हीओडी (सबस्क्रीप्शन, व्हीडियो ऑन डिमांड) पुरवठादारांमध्ये आधीच अग्रेसर आहे. फिचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, भक्तीमय आणि सिनेमा ट्रेलर्स अशा विस्तृत श्रेणीत व्हिडिओ कंटेट यावर उपलब्ध आहे.

रिलायन्स एन्टरटेनमेंट- डिजीटलचे सीईओ श्री. अमित खंडूजा म्हणाले की, “व्हिडीओ कंटेटला मागणी वाढते आहे. भारतात आणि इतर ठिकाणीही डिजीटल प्लॅटफॉर्मला मोठा प्रेक्षक आहे. बिगफ्लिक्सच्या माध्यमातून धर्मा प्रॉडक्शन्स, डिस्ने, वायकॉम, फँटम फिल्म्स, तेलुगू वन आणि राजश्रीसारख्या मोठ्या बॅनर्सकडून उच्च दर्जा असलेला व्हिडीओ कंटेट पुरवणार आहे.”

बिगफ्लिक्सचा नवा अवतार जगभरातील भारतीयांच्या आवडीनिवडी पूर्ण करेल. आपल्या बहुभाषी २००० हून अधिक एचडी फिल्म्स लायब्ररीसमवेत नव्या फिल्म्स उपलब्ध करून पायरसीला पायबंद घालेल आणि खराब दर्जाचा सिनेमा पाहण्याला छेद देईल. बिगफ्लिक्स हा जगातील सर्वात मोठा एसव्हीओडी पुरवठादार असून त्यांच्याकडे ३.९ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. दर महिन्याला रु ५० इतक्या कमी दरात अमर्याद सिनेमे पाहण्याचा आनंद घेता येईल. शिवाय बिगफ्लिक्स कोणतीही वर्गवारी, भाषा आणि प्लॅटफॉर्म यामध्ये फेरफार न करता दर्जेदार मनोरंजनाचे दार खुलं करण्यासाठी सज्ज झाले आहे.