मोहोब्बतें आणि धूम सिनेमातील उदय चोप्रा आठवतोय का? या सिनेमांतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना फारसा आवडला नसला तरी त्याची पिळदार शरीरयष्ठी अनेकांना भावली होती. त्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्ये आपले नशीब आजमावयाचा फार प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश आले नाही. २०१३ मध्ये त्याचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मात्र उदयचे सिनेकरिअर अस्तालाच गेले.

 

नुकतेच उदयचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याचे हे फोटो पाहून मोहोब्बतें आणि धूम सिनेमात काम केलेला हाच तो उदय का असा प्रश्न अनेकांना पडेल. सिक्स पॅक अॅब्स, मसल्स अशा लूकमधील उदय दिसत नसून पोट सुटलेला गाल वर आलेला उदय पाहून सर्वांना आश्चर्यच वाटले.

प्रसारमाध्यमांपासून दूर राहणारा उदय काल अभिनेता इम्रान हाश्मीच्या घरातून बाहेर येताना दिसला. त्याचे वजन भलतेच वाढले असून पहिल्यांदा पाहून हाच उदय चोप्रा असे कोणाच्या लक्षातही येणार नाही. नर्गिस फाख्रीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे उदयची ही अवस्था झाली की काय? असा प्रश्नही आता अनेकांच्या मनात येऊ लागला आहे.

गेल्यावर्षी दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. पण यावर्षी मे महिन्यात उदय आणि नर्गिस यांना विमानतळावर एकत्र पाहण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे कपल एकत्र आले असल्याचा अंदाज बांधायला सुरूवात झाली होती. पण अर्थात नर्गिसला याबाबत प्रश्न विचारला असता ती आणि उदय रिलेशलमध्ये असल्याच्या वृत्ताला तिने सपशेल नकार दिला.

काही दिवसांनी नर्गिसने उदयला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काही तरी होते या वृत्ताला बळ मिळत गेले. या ब्रेकअपमुळे उदय डिप्रेशनमध्ये तर गेला नसेल ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.