नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याला प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रिचा चढ्ढा हिचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. आपल्या बोल्ड वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी रिचा आता चक्क मराठीची बाराखडी गिरवतेय.. आता ही कोणता मराठी सिनेमा करणार आहे का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तुमच्या या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे.

‘इनसाइड एज’ या वेब सिरीजमध्ये ती झळकली होती. या सिरीजमध्ये तिने झरिना नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या या भूमिकेचं कौतुकही सर्व पातळीवरुन झालं. पण आता रिचा ‘थ्री स्टोरीज’ या मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात चाळीत राहणाऱ्या मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे. तिला अस्खलित नाही पण किमान चांगलं मराठी बोलता यावं म्हणून रेणुका शहाणे तिला मराठी बोलण्यात मदत करत आहे.

‘विनोदाचा ‘मीटर’ पाळावाच लागतो’

कोणत्याही भूमिकेसाठी समरसून काम करण्याच्या रिचाचा हाच स्वभाव तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळं दाखवतो. ती सिनेमाच्या सेटवर तसेच शेजाऱ्यांशीही सध्या मराठीमध्येच बोलताना दिसते. या सिनेमाबद्दल तिला विचारले असता तिने सध्या काही बोलणं योग्य नसल्याचे म्हटले.

‘थ्री स्टोरीज’ या सिनेमाची कथा ही चाळीतील तीन वेगवेगळ्या कथांशी निगडीत आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल अण्टरटेनमेन्ट या सिनेमाची निर्मिती करत असून सिनेमाचे दिग्दर्शन अर्जुन मुखर्जीचे आहे. या सिनेमाची तारीख २५ ऑगस्ट सांगण्यात आली आहे.

‘…तर मी शेतकरी झाले असते,’ कंगनाचं सैफला प्रत्युत्तर

‘मसान’ सिनेमातील रिचाच्या अभिनयाचे साऱ्यांनीच कौतुक केले. तर ‘सरबजीत’ सिनेमामुळे ऋचा चढ्ढाला प्रसिद्धीही मिळाली. रिचाच्या मते, कोणतीही भूमिका छोटी- मोठी नसते. जी भूमिका तुमच्या वाट्याला येते तिला पूर्ण न्याय देणे तुमच्या हातात असते. रिचाने आतापर्यंत ‘ओय लकी लकी ओय’, ‘गँग ऑफ वासेपुर’ १ आणि २, ‘फुकरे’, ‘राम-लीला’, या सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.