ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आत्मचरित्र लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. पण, त्या आधीच या पुस्तकातील काही किस्से अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आपल्या वडिलांबद्दलही लिहिले आहे. मुख्य म्हणजे या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी राज कपूर यांचे चित्रपट, मद्यपान आणि चित्रपटातील नायिकांविषयी असलेले वेड यावरुन पडदा उचलला आहे. ‘खुल्लम खुल्ला’ असे नाव असणाऱ्या या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी राज कपूर आणि त्यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रींसोबतच्या त्यांच्या नात्याविषयी लिहिले आहे.

ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून त्यांचे आणि राज कपूर यांच्या वडिल मुलाच्या नात्याची एक वेगळीच बाजू वाचकांच्या भेटीस येणार आहे. या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्गिस दत्त आणि राज कपूर यांच्या नात्यावरुनही पडदा उचलला आहे. हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार याविषयी ऋषी कपूर यांनी लिहिले आहे की, ‘त्या वेळी माझे वडिल म्हणजेच राज कपूर २८ वर्षांचे होते. त्याचवेळी बहुधा त्याच्या काही वर्षांआधीपासूनच ते ‘शो मॅन’ म्हणूनही ओळखले जात होते.’. इथे ऋषी कपूर यांनी राज कपूर यांचा ‘मॅन इन लव्ह’ असा उल्लेख करत ‘तेव्हा ते (राज कपूर) माझ्या आईव्यतिरिक्त कोणा एका दुसऱ्या स्त्रिच्याही प्रेमात होते. त्यांच्या ‘आग’ (१९४८), ‘बरसात’ (१९४९) आणि ‘आवारा’ (१९५१) या गाजलेल्या चित्रपटांच्याच नायिका त्यांच्या प्रेयसी होत्या.’

nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

नर्गिस यांचा ‘इनहाऊस हिरोइन’ असाही उल्लेख ऋषी कपूर यांनी केला आहे. याचसोबत त्यांनी वैजयंतीमाला (वय ६४) आणि त्यांच्या वडिलांचेही प्रेमसंबंध असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी वैजयंतीमालांनी आपले राज यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे नाकारले होते. मला अजूनही आठवते, माझे वडिल हे प्रसिद्धीसाठी भुकेले असल्यामुळे ते चित्रपटांमध्ये रोमान्स दाखवितात असे वैजयंतीमाला यांनी म्हटले होते. केवळ आज माझे वडिल सत्याची बाजू मांडण्याकरिता जीवंत नाहीत म्हणून त्यांना (वैजयंतीमाला) या गोष्टींचा विपर्यास करण्याचा काहीच अधिकार नाही. माझे वडिल जीवंत असते तर वैजयंतीमालांनी त्यांचे अफेअर इतक्या वाईटपणे नाकारले नसते आणि माझ्या वडिलांवर ते प्रसिद्धीचे भुकेले असल्याचा आरोपही केला नसता.

राज कपूर यांचे मद्यपान आणि व्हिस्कीविषयीचे प्रेम याबाबतही ऋषी कपूर यांनी लिहिले आहे. राज कपूर त्यांच्या व्हिस्की फारच पझेसिव्ह होते असेही ऋषी कपूर यांनी या पुस्तकात न विसरता नमूद केले आहे. राज कपूर यांच्यासोबत असलेल्या नात्यावरुन पडदा उचलताना ऋषी कपूर यांनी लिहिले आहे की, ‘माझ्यासाठी राज कपूर माझ्यासाठी वडिलांसोबतच माझे गुरुही होते. नर्गिसजींनंतर मीच एक असा आहे ज्याने त्यांच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे.’ ऋषी कपूर यांच्या या विधानांमुळे त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रातून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.