नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडनंही डोक्यावर घेतलं आहे. मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनाही झिंगाट गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.
सैराट चित्रपटाबरोबरच त्याची गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या सो यू थिंक यू कॅन डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हाऊसफूल 3च्या टीमने सिनेमाच्या प्रमोशच्या निमित्ताने हजेरी लावली आहे. या शोच्या मंचावर रितेश देशमुख, अक्षय कुमारसह या डान्स शोची जज माधुरी दीक्षितनेही झिंगाट गाण्यावर धुमाकूळ घातला.  हा एपिसोड २८ आणि २९ मे रोजी रात्री ८.३० प्रसारित होणार आहेत. माधुरी, रितेश, अक्षय बेभान होऊन झिंगाट गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.