‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट इतर बॉलिवूड चित्रपटांपेक्षा सर्वार्थाने वेगळा असाच चित्रपट आहे. मनोरंजन आणि मानवी वृत्तींची मसालेदार फोडणी आपल्याला आजवर चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. पण हे सूत्र नाकारून सचिन तेंडुलकर sachin tendulkar जस्सा आहे, तस्साच्या तसा या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. सचिनने यात सूत्रधाराची भूमिका घेत आपल्या अब्जावधी क्रिकेटरसिकांचे स्वप्न साध्य करण्याचा प्रवास यात मांडला आहे.

वाचा : विनोद कांबळीच्या प्रेमळ ट्विटमुळे चाहते रमले भूतकाळात

सचिन तेंडुकरच्या जीवनावर आधारित ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ sachin a billion dreams चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई केल्याचे व्यापार समीक्षकांचे म्हणणे आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ८.४ कोटी, शनिवारी ९.२ कोटी आणि रविवारी १०.२ कोटी रुपयांची कमाई केली. पण, या कमाईतून सचिनने चित्रपटासाठी घेतलेले मानधनसुद्धा निघालेले नाही. काही वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार, सचिनने त्याच्या बायोपिकसाठी ४० कोटी रुपये घेतल्याचे समजते. तर निर्मिती संस्थेतील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा अगदी ४० कोटी नसून त्याने ३५ ते ३८ कोटी रुपये घेतले आहेत.

वाचा : कपिल शर्माच्या शोमध्ये सचिनने जाणं टाळलं!

दरम्यान, सचिनने सांगावे आणि ते जसेच्या तसे चित्ररूपात तुमच्यासमोर उभे राहावे, ही किमया ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपटात दिग्दर्शक जेम्स अर्सकिन यांनी लिलया साधली आहे. सचिन, सचिनची बहीण सविता, भाऊ नितीन आणि अजित, आई-वडील, पत्नी अंजली, आचरेकर सर ही मंडळी त्या त्या काळातील फुटेजमध्ये त्यांच्या वास्तव रूपात चित्रपटात पाहायला मिळतात. २६ मे रोजी ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला होता. भारतात २४०० आणि परदेशात ४०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.